यवतमाळ :- उमरसरा परिसरातील न्यु गिलाणी नगरात आज आषाढी एकादशीनिमित्त वृक्षाराेपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम रोटरीचे अध्यक्ष जाफर सादीक गिलाणी यांच्या हस्ते पार पडला.
यावेळी अध्यक्ष किसनराव बडवणे, सचिव अरविंद गुरनूले, माजी नगरसेवक पंकज देशमुख, रविंद्र सेत, दत्तात्रय मुक्कावार, प्रकाशराव काकडे, माणिकराव मस्के, दिपक सवाने, निलिमा देशपांडे, अनिता गुरनूले, मिनाक्षी शेलेकर, प्राची वैद्य, मेघा निलावार, माया सुने, किरण देशकर, सुरेश अजकुलवार, शिवदास गुल्हाणे, गणेश बानोरे, शतप्रकाश उमरे, विलास भगत आदी उपस्थित होते. यावेळी बोलतांना रोटरीचे अध्यक्ष जाफर सादीक गिलाणी म्हणाले की, वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. कारण की पृथ्वीवरील तापमान प्रचंड प्रमाणात वाढत असल्याने प्रत्येकाने वृक्षारोपण करणे गरजेचे आहे. वृक्षारोपण केल्याने वातावरण संतुलीत राहते. आणि जमिनीची धुप थांबविण्यासाठी चांगला उपयोग होतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी वृक्षारोपण करुन आपले कर्तव्य निभवावे, असे ते म्हणाले.