संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 20 :- वातावरणाचा वाढता दुष्परिणाम लक्षात घेता ग्लोबल वार्मिंग मुळे ऋतू मध्ये बदल झालेला दिसतो तेव्हा वातावरणाच्या संगोपणासाठी व पर्यावरनाच्या रक्षणासाठी वृक्ष संवर्धन ही काळाची गरज झाली असल्याचे मौलिक मत कांग्रेस चे माजी महाराष्ट्र प्रदेश महासचिव व नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर यांनी आज 20 ऑगस्ट माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व राजीव गांधी यांच्या जयंतीदिनानिमित्त सदाशिवराव पाटील शिक्षण संस्था परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात व्यक्त केले. तसेच स्व राजीव गांधी यांच्या जीवनपटावर मौलिक मार्गदर्शन केले.
हे वृक्षारोपण कार्यक्रम कांग्रेस सेवादल चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास राव ओताड़े यांच्या आदेशानुसार व नागपुर जिला अध्यक्ष तुळसी राम काळमेघ यांच्या निर्देशानुसार करण्यात आले.याप्रसंगी प्रामुख्याने माजी जिला परिषद अध्यक्ष सुरेश भोयर,महाराष्ट्र यूथ कांग्रेस महासचिव इरशाद शेख,महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस सेवादल सह सचिव राजकुमार गेडम,कामठी शहर कांग्रेस सेवादल अध्यक्ष मोहम्मद सुल्तान,नागपुर जिला कांग्रेस सेवादल महासचिव सोहेल अंजुम,नागपुर जिला कांग्रेस सेवादल संगठक सचिव अब्दुल सलाम अंसारी,नागपुर जिला यूथ कांग्रेस उपाध्यक्ष राशिद अंसारी,कामठी शहर महिला कांग्रेस सेवादल अध्यक्ष मंजू मेश्राम,आकाश भोकरे,प्रकाश लाइन पांडे,अंबिका रामटेके,विभा मेश्राम, आजब राव उके,रफीक खान, बबन खोंडरे, आदी पदाधिकारिसह इतर कार्यकर्ता उपस्थित होते.