नागपूर :- जुन्या कर प्रणाली नुसार आयकर कपातीसाठी सर्व आयकर पात्र निवृत्तीवेतन धारकांनी 10 मे 2023 पर्यंत कोषगार कार्यालयामध्ये विकल्प भरूण देण्याचे आवाहन, वरिष्ठ कोषगार कार्यालयाने केले आहे.
कार्यालयाच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, मागच्या वर्षापासून आयकर नियमामध्ये बदल झाल्यामुळे दोन पध्दतीने आयकर कपात करण्यात येत आहे. सन 2023-24 मध्ये नवीन कर प्रणाली डिफॉल्ट घोषित करण्यात आलेली आहे.यामुळे जुन्या पध्दतीने आयकर कपात करावयाची असल्यास विकल्प सादर करणे आवश्यक आहे.
पात्र निवृत्तीवेतन धारकांनी दिलेल्या मुदतीत विकल्प सादर न केल्यास त्यांचा आयकर नवीन प्रणाली नुसार कपात करण्यात येईल, असे वरिष्ठ कोषागार कार्यालयाने कळविले आहे.