शाळांमध्ये परिवहन समिती स्थापन करावी – पोलीस आयुक्त अमितेश कुमार

Ø क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई

नागपूर :- विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी प्रत्येक शाळेमध्ये परिवहन समितीची स्थापना करणे अनिवार्य असुन शाळांनी तातडीने परिवहन समिती स्थापन करावी, अशा सूचना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिल्या.

वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये आज शालेय परिवहन समितीची बैठक आयोजित करण्यात आली. होती. त्यावेळी ते बोलत होते. सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, वाहतूक पोलीस विभागाच्या उपायुक्त चेतना तिडके, ग्रामीण पोलिस अधिक्षक विशाल आनंद, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी ( माध्यमिक) रवींद्र काटोलकर याची प्रामुख्याने उपस्थित होते.

अमितेश कुमार म्हणाले की, घरातून शाळेसाठी निघणारे आणि शाळेतून घरी परतणाऱ्यां विद्यार्थ्यांची संपूर्ण जबाबदारी ही शाळेवर असते. यामुळे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता हा अत्यंत गंभीर विषय आहे. अनेक शाळांच्या परिसरामध्ये पार्किंगचा अभाव असल्याने स्कूल बस चालक आपले वाहन रस्त्याच्या कडेला उभे करतात. रस्ता ओलांडताना तो सुरक्षितपणे ओलांडावा यासाठी शिक्षकांनी मुलांना रस्ता सुरक्षिततेचे ज्ञान देणेही आवश्यक आहे. मुलांना शाळेमध्ये सोडणाऱ्या वाहनांची स्थिती तपासून क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई होणे आवश्यक आहे, याकडे फक्त पोलीस विभागाने लक्ष देऊन चालणार नाही तर शिक्षक, पालक, विद्यार्थी यांनी जागृत असणे महत्त्वाचे आहे.

शाळेमध्ये छेडखाणीचे प्रकार होवू नये म्हणून मुलींच्या सुरक्षितेसाठी पोलीस विभागाने ‘पोलीस काका’ ‘पोलीस दीदी’ हा उपक्रम राबवला आहे. आर्थिकदृष्टया दुर्बल विद्यार्थ्यांना कमी दरात प्रवास करता यावा, याकरिता नागपूर महानगरपालिका आणि मेट्रो यांच्या समन्वयाने पासेस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अमितेशकुमार यांनी सांगितले.

क्षमतेपेक्षा जास्त वाहतूक करत असल्याचे निर्दशनास आल्यास मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचे सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे यांनी सांगितले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सोम्या शर्मा, रवींद्र काटोलकर, चेतना तिडके यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र भुयार यांनी केले, तर आभार सुशील बनसोडे यांनी मानले. याप्रसंगी परिवहन विभागाच्यावतीने नव्याने तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाचे उद्घाटन अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षक कायद्याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Fri Jul 14 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिका, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा परिषद आणि शिक्षणविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बालकांचे अधिकार व बालकांसाठी असलेल्या कायद्यांबाबत जागृती’ कार्यक्रमाचा शुभारंभ आज शुक्रवारी १४ जुलै रोजी कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग येथे करण्यात आला. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून जिल्हा न्यायायाधीश जे.पी. झपाटे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर नागपूर चे सचिव सचिन पाटील, जिल्हा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com