सोनेगाव राजा येथे कामठी तालुका शोध व बचाव पथकास एसडीआरएफ मार्फत प्रशिक्षण

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- मागील तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेंला अतिवृष्टीचा फटका मिळत प्रशासनाची तारांबळ न होता नागरिकांचा जीव मुठीत न यावा यासाठी नियोजित पद्धतीने खबरदारी घेण्याच्या पूर्वयोजना म्हणून कामठी तहसील कार्यालय च्या तालुका शोध व बचाव पथकास आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) मार्फत आज 23 मे ला सोनेगाव राजा येथे कन्हान नदीवर तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनार्थ प्रशिक्षण देण्यात आले.

मागील तीन वर्षांपूर्वी पावसाळ्यात कामठी तालुक्यात सुरू असलेल्या सुरू असलेल्या संततधार पावसाने पावसाची सरासरी ओलांडली होती.तसेच सर्वत्र सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पेंच प्रकल्पातील पाण्याचा वेढा वाढल्याने नाईलाजास्तव पेंचचे सोळा दरवाजे उघडण्यात आले होते. परिणामी हा जलाशय कन्हान नदीत विसर्ग झाल्याने कन्हान नदी फुगल्याने या नदी काठावरील कामठी तालुक्यातील कन्हान नदी काठावरील बिडबिना व सोनेगाव राजा गावाला पुराणे वेढले होते.तसेच दोन्ही गावांना बेटाचे स्वरूप प्राप्त झाले होते.सोनेगाव राजा येथे 350 तर बिडबिना येथील 36 नागरिक पुरात अडकले होते .याप्रसंगी तत्कालीन एसडिओ श्याम मदनूरकर व तत्कालीन तहसीलदार अरविंद हिंगे यांनी तालुका प्रशासनाच्या वतीने त्वरित दखल घेत जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन पथकाने रेस्क्यू ने बोटी ने सुरक्षित बाहेर काढण्यात यश गाठले होते.तर अशी परिस्थिती मागील सन 1994 मध्ये झालेल्या पावसाची पुनरावृत्ती झाल्याचे सांगण्यात येत होते.

तेव्हा अशा नैसर्गिक आपत्तीचा फटका लागत यासारखी अतिवृष्टीची पुनरावृत्ती न व्हावी व प्रशासनाची एकच तारांबळ न होता नागरिकांचा जीव मुठीत म यावा यासाठी शासनाकडून नागपूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास प्राप्त झालेल्या रबरी बोटीचा उपयोग कामठी तालुका शोध व बचाव पथकास ऐन वेळी नागरिकांचा जीव वाचविण्यासाठी कसा उपयोग करता येईल यासाठी कामठी तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण चे अध्यक्ष व तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या मार्गदर्शनार्थ आज 23 मे ला सकाळी 10 वाजता सोनेगाव राजा येथे कन्हान नदीवर तालुका शोध व बचाव पथकातील नायब तहसीलदार राजीव बमनोटे,मंडळ अधिकारी महेंद्र कांबळे, वाहनचालक युवराज चौधरी, कोतवाल कुंजीलाल पानतावणे ,आदींना रबरीच्या बोटीवर बसवून नदीत प्रशिक्षण देण्यात आले.याप्रसंगी आपत्ती प्रतिसाद दल पथक (एसडीआरएफ),कामठी तालुका आपत्ती व्यवस्थापन पथक, तलाठी, मंडळ अधिकारी ,पोलीस वर्ग आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : उपद्रव शोध पथकाची कारवाई

Tue May 23 , 2023
नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार ता.23) 9 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे हरित न्यायाधिकरण कायद्यांतर्गत रस्त्याच्या कडेला जेवण/अन्न फेकणे आणि वाया घालवणेबाबतची कारवाई करून मे कुशन क्रियेटर्स, रामनगर चौक, नागपूर यांच्यावर 10 हजार रुपयांचा दंड वसूल […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com