कसोटी क्रिकेट सामन्यादरम्यान वाहतूक मार्गात बदल

नागपूर : जिल्हयातील जामठा क्रिकेट स्टेडियमवर 9 ते 13 फेब्रुवारीदरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघादरम्यान कसोटी सामना खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी जड वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत.

उभय संघादरम्यानचा हा सामना पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आपल्या वाहनाने जामठाकडे येतात. त्यामुळे वर्धा रोडवर वाहतुकीची कोंडी होऊन अपघातप्रवण परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच जड वाहतूक करणारी वाहने या गर्दीत अडकून त्यांची देखील गैरसोय होणार आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय टाळण्याकरीता जड वाहनांना नऊ ते 13 फेब्रुवारीदरम्यान वर्धा रोड कडून नागपूर आऊटर रिंगरोड कडे येणारी जड वाहतुकीला क्रिकेट सामना सुरू होण्यापुर्वी तसेच सामना संपेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश बंद करण्यात येणार आहे.

हैद्राबाद, वर्धा मार्गाने नागपूर शहराकडे येणारी जड वाहतूक डोंगरगाव टोल नाका येथे थांबविण्यात येणार आहे. कामठी, भंडारा आऊटर रिंग रोडने वर्धा रोडकडे जाणारी वाहतूक पांजरी टोल नाक्याजवळ, अमरावती रोडकडुन वर्धा रोड कडे जाणारी वाहतूक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट फाट्याजवळ थांबविण्यात येणार आहे. ही वाहतूक फक्त सामना चालु होण्याअगोदर व नंतरच थांबविण्यात येणार आहे. इतर वेळेस वाहतूक सुरळीत सुरू राहील, असे वाहतूक शाखेच्या पोलिस उपायुक्त चेतना तिडके यांनी कळविले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

तुमसर तहसील कार्यालयावर विकास फाउंडेशन भूमीपुत्रांचा जनसुनावणी धडक मोर्चा

Thu Feb 9 , 2023
नितीन लिल्हारे,प्रतिनिधी  पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या भंडारा जिल्ह्यात धडक मोर्चा  मोहाडी :- भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्ह्यात समस्या दूर होईना त्यामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रश्न व मागण्यांसाठी विकास फाउंडेशनचे संस्थापक तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली विकास फाउंडेशनच्या वतीने आज तुमसर तहसिल कार्यालयावर भूमीपुत्रांचा जनसुनावणी धडक मोर्चा काढण्यात आला. घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!