– एक आरोपी अटक, वाहनासह २३,४०,००० रुपयां चा मुद्देमाल जप्त
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत बोरडा शिवारात नागपुर ग्रामीण जिल्हा वाहतुक पोलीसांनी नाकाबंदी करुन गोवंशाने भरलेल्या आयसर वाहनाला पकडुन २९ गोवंशाला जीवनदान देत एका आरोपीला ताब्यात घेऊन २३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन गुन्हा दाखल केला आहे.
प्राप्त माहितीनुसार शनिवार (दि.२२) फेब्रुवारी ला सकाळी १० वाजता नागपुर ग्रामीण जिल्हा वाहतुक पोलीस विजय तायडे, रविंद्र बर्वे, पोना अतुल दुमने, पोशि मनिष चव्हाण, चालक सफौ सुधिर यादव सह कर्मचारी कन्हान विभागांर्तगत वाहतुक नियमाचे उल्लं घन करणाऱ्यांवर कारवाई करने कामी पेट्रोलिंग करित असतांना पोहवा रविंन्द्र बर्वे ना गुप्त माहिती मिळाली की, देवलापार मार्गाने नागपुरकडे एक आयसर ट्रक वाहन क्र. एमएच ३४-८ जी- ९१४३ मध्ये अवैधरित्या गोंवश जनावरे कत्तलीकरिता वाहतुक करित आहे. अश्या माहितीवरुन वाहतुक पोलीसांनी बोरडा शिवारात नाकाबंदी केली असता देवलापार कडुन आयसर ट्रक नागपुर च्या दिशेने येतांना दिसुन आला. वाहन चालकास वाहन थाबविण्याचा इशारा केल्याने वाहन चालकाने पोलीसांना पाहुन वाहन रोड चे बाजुला थांबविले असता तेवढयात वाहनात वाहन चालकाचे बाजुला बसलेला इसम हा पळुन गेला.
पोलीसांनी वाहन चालक सरफराज खान वल्द समद खान वय २८ रा. ताज नगर टेका नाका नागपुर यास ताब्यात घेत पळुन गेलेल्या इसमाचे नाव विचारले असता जावेद शेख रा. ताजबाग नागपुर असे सांगितले. पोलीसांनी आयसर वाहनाची पाहणी केली असता वाहनाचे डाल्यात लाल, काळया व पाढऱ्या रंगाचे एकुण ३२ बैल गोवंश अत्यं त निर्दयतेने कुरपणे व क्लेशदायक पध्दतीने यातना देत त्यांचा मानेला, पायांना आखुड दोरीने बाधुन चारा पाणी न देता कत्तलीकरिता नेतांनी मिळुन आल्याने पोलीसांनी वाहन चालकास गोवंश बाबत विचारपुस केली असता त्यांनी सांगितले की, गोवंश जावेद शेख यांनी जबलपुर येथील संतुकाका इसमा कडुन खरेदी करून हैदराबाद येथे घेवुन जात असल्याचे सांगितले. पोलीसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन आरोपी सरफराज खान वल्द समद खान ला ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ३२ गोवंश किंमत ६ लाख ४० हजार रूपये आणि आयसर वाहन किंमत १७ लाख रूपये असा एकुण २३,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गोवंशाना पुढील देखरेखी करिता गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथे दाखल करून त्याची पशु वैद्यकीय अधिकारी कडुन तपासणी केली असता वाहनात कोंबुन जख्मी अवस्थेत असलेले व चारा पाणी न दिल्याने तीन गोवंश मरण पावले. गो विज्ञान अनुसंधान केंद्र देवलापार येथील पशु वैद्यकिय अधिकारी यांनी वैद्यकिय प्रमाण पत्र दिल्याने तीन गोवंशाची दफन विधी करण्यात आली. या प्रकरणी कन्हान पोलीसांनी वाहतुक पोलीस हवालदार विजय तायडे यांचे तक्रारी वरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.