सायंकाळी ठरेल सांघिक विजेता,सोमवारी समारोप सोहळा
नागपूर :- नागपूर विभागीय क्रीडा व सांस्कृतीक स्पर्धेच्या दुस-या दिवशी सहा जिल्हयामध्ये सांघिक विजेत्या पदासाठी चुरशीची लढत अजूनही सुरु आहे. प्रत्येक जिल्हयाने वेगवेगळा क्रिडा प्रकारात आघाडी घेतल्यामुळे उद्या या संदर्भात अंतिम चित्र स्पष्ट होईल, उद्या सायंकाळी विभागीय संकुलनात समारोप सोहळा होणार आहेत.
या स्पर्धेत सर्व सामने विभागीय क्रीडा संकुल मानकापूर येथे होत आहे. फक्त विदर्भ क्रिकेट असोशिशनच्या मैदानावर तर जलतरण स्पर्धा महानगर पालिकेच्या तरण तलावर होत आहे.
जिल्हाधिका-यांच्या 3 विकेट मात्र चंद्रपूरची नागपूरवर मात
विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आज दिनांक 26 फेब्रुवारी रोजी नागपूर व चंद्रपूर जिल्हयामध्ये क्रिकेटचा सामना खेळला गेला. 12 षटकाच्या या सामन्यामध्ये चंद्रपूर जिल्हयाने 4 गडी राखून विजय मिळवला.
चंद्रपूर जिल्हयाने प्रथम नाणेफेक जिंकून नागपूर जिल्हयाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. 12 षटकांच्या सामन्यामध्ये नागपूर महसूल विभागाने 5 विकेट्स गमावून 91 धावांचे आव्हान चंद्रपूर महसूल जिल्हयापुढे ठेवले. 91 धावांचा पाठलाग करीत असतांना चंद्रपूर महसूल विभागाने चार गडी गमावून 91 धावांचा पाठलाग करीत विजय काबीज केला.
नागपूर व चंद्रपूर जिल्हयामध्ये अखेरपर्यत अटीतटीचा सामना राहिला.अखेरच्या षटकात चंद्रपूर जिल्याने विजयाचे लक्ष गाठले.नागपूर महसूल विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी 3 षटकामध्ये 34 रन देत तीन बळी घेतले. मयूर ठेकेदार यांनी 1.3 षटकामध्ये 9 रन 2 बळी घेतले. आतिश शेख 29 चेडूत 27 धावा, शमेन मरे 13 चेंडूत 21 धावा, ताराचंद तावडकर 14 चेंडूत 21 धावा, चंद्रपूर रिशित पाटील 10 चेंडूत 20 धावा, राहुल फणसे 10 चेंडूत 9 धावा, अजय घाडगे 8 चेंडूत 7 धावा तर चंद्रपूर जिल्हयाने 91 धावांचे लक्ष गाठीत विजय मिळवला.
दुस-या दिवशी गडचिरोली आघाडीवर
मानकापूर विभागीय क्रिडा संकूल येथे सुरु असलेल्या स्पर्धेमध्ये गडचिरोली जिल्हयाने थाळी फेक, भाला फेक, गोळा फेक, या स्पर्धेमध्ये महिला व पुरषांनी विजय मिळवला. 100 मिटर धावने, 400 मिटर धावने यामध्ये गडचिरोली जिल्हयाने विजय प्राप्त केला. पुरुष खो-खो स्पर्धेमध्ये भंडारा व गोंदिया जिल्हयामध्ये सामना झाला. यामध्ये गोंदिया जिल्हयाने एका गुणाने विजय मिळवला. महिला खो-खो स्पर्धेमध्ये नागपूर व भंडारा जिल्हयात खो-खो स्पर्धा झाली यामध्ये भंडारा जिल्हयाने दोन गुणांने विजय मिळवला. विभागीय आयुक्त कार्यालय नागपूर व गडचिरोली पुरुष खो-खो स्पर्धेमर्ध्ये गडचिरोली जिल्हयाने 15 गुणांनी विजय मिळवला. कॅरमस्पर्धेमध्ये गडचिरोली जिल्हाने विजय मिळवला.
वर्धा, गोंदिया, गडचिरोली सांस्कृतीक कार्यक्रम
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केल्यानंतर सांस्कृतीक कार्यक्रमांना सुरुवात झाली. चंदपूर, भंडारा नागपूर जिल्हा व नागपूर विभागीय आयुक्त कार्यालय अशा चार चमुने आपल्या सांस्कृतीक कला प्रदर्शनाचा अविष्कार दाखविला. भंडारा जिल्हयाच्या वतीने सादर करण्यात आलेली महसूल कव्वाली श्रोत्यांना मंत्रमुंग्द आणि अंतर्मुख करणारी ठरली. याशिवाय कर्मच्या-यांनी सादर केलेल्या अनेक कलाकृतीमध्ये महसूल विभागाच्या गमतीजमती, मागण्या आणि अतिरिक्त कामाच्या विषयांची मांडणी अतिशय खुबीने कर्मच्या-यांनी आपल्या सादरीकरणात केली. गडचिरोली, गोंदिया, वर्धा जिल्हयाच्या चमू सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करणार आहे.