आज एकाच दिवशी उष्मघाताने घेतला दोघांचा बळी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– मागील चार दिवसात चौघांचा मृत्यु

कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी रेल्वे स्टेशन समोर एका अनोळखी इसमाचा मृतदेह आज सकाळी 6 वाजता आढळला असून त्याचंदरम्यान हॉकी बिल्डींग चौकात एका मजुराचा मृतदेह आढळला असून मृतकाचे नाव योगीराज गंगाराम सहारे वय 55 वर्षे रा रमानगर कामठी असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सदर मृतक हा मजूर म्हणून कार्यरत असून काल सकाळी सोनार ओळीत कामाला जाऊन दिवसभर काम करून सायंकाळी सहा वाजता घरी जाण्यास निघाला मात्र घरी पोहोचला नाही.घरमंडळींनी शोधाशोध केली मात्र कुठेही थांगपत्त लागला नाही मात्र आज सकाळी चक्क मृतदेहच आढळला हा मृत्यू उष्मघाताने झाला असे तर्क लावण्यात येत आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सदर घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनगृहात मृतकाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आली.तर अनोळखी मृतदेहाला पुढील उत्तरीय तपासणीसाठी श्वविच्छेदनगृहात हलविण्यात आले.

-25 मे पासून सुरू झालेल्या नवतपा पासून कामठी तालुक्यात सूर्याने आग ओकने सुरू केली असून उष्णतेचा पारा हा 45 पर्यंत 

पोहोचला आहे. उष्णतेच्या लहरी मुळे अंगाची लाही लाही होत असल्याने रस्त्यावर शुकशुकाट दिसून येतो त्यातच मजूर वर्ग तसेच भिक्षेकरू या रखरखत्या उन्हाची कुठलीही तमा न बाळगता संसाराचा गाढा चालविण्यासाठी राबत आहेत त्यातच या उष्मघाताने आज एकाच दिवशी दोघांचा बळी गेल्याची घटना आज सकाळी 6 वाजता निदर्शनास आली तर तीन दिवसापूर्वी अजून दोघांचा उष्मघाताने मृत्यु झाला त्यात विनोद पांडे वय 35 वर्षे रा अब्दुल्लाशाह दरगाह,कामठी तर दुसरा मृतक 60 वर्षोय अनोळखी भिक्षेकरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

जिला परिषद में आंगनवाड़ी श्रेणीवर्धन घोटाला

Thu May 30 , 2024
– बिना निविदा दिए ठेके, लाखों का किया भ्रष्टाचार – भाजपा के शिष्टमंडल ने की उपमुख्यमंत्री से शिकायतhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 – शिष्टमंडल में सुधाकर कोहले पूर्व विधायक , उदयसिंह यादव, मनोहर कुंभारे, आतिश उमरे शामिलhttps://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-16.38.56_131274e2.mp4 नागपुर :- जिला परिषद नागपुर के महिला व बालकल्याण विभाग अंतर्गत केंद्र शासन की आंगनवाड़ी श्रेणीवर्धन योजना में घोटाला सामने आया है। भाजपा ने विभागीय आयुक्त कार्यालय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com