– डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचा समारोप
नागपूर :- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते “घर घर संविधान” या शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या दिवशी 14 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता नागपूर जिल्हयातून होत आहे. या कार्यक्रमास राज्यमंत्री आशिष जयस्वाल व खासदार शामकुमार बर्वे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंती निमित्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडीटेरियम, दीक्षाभूमी, नागपूर येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते लाभार्थ्यांना लाभाचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील मान्यवर व्यक्तीचे स्मारक बांधणे, तसेच सांस्कृतिक व ऐतिहासिक स्थळांचा विकास करणे, स्टँड अप इंडिया योजनेतील लाभार्थी, रमाई आवास घरकुल योजनेतील लाभार्थी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी, तृतियपंथियांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेतील लाभार्थ्यांना लाभाचे वाटप, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र पडताळणी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येणार आहेत.
या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम, विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, पोलीस आयुक्त डॉ.रविंद्रकुमार सिंगल, मनपा आयुक्त डॉ.अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, पोलीस अधिक्षक हर्ष पोद्दार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कमलकिशोर फुटाणे, समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपाध्यक्ष डॉ.मंगेश वानखेडे, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे प्रादेशिक उपसंचालक विजय वाकुलकर, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण सुकेशिनी तेलगोटे उपस्थित राहणार आहेत.