नागपूर :- “तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दुंगा” भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची ज्वाला उत्पन्न करणारी घोषवाक्य देणारे भारत मातेचे वीर सुपुत्र महान स्वातंत्र्य सैनानी, थोर क्रांतीकारक, भारतरत्न, देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस आणि हिंदु हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे गुरुवारी (23) आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदू हदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी अति. आयुक्त अजय चारठाणकर, उपायुक्त विजया बनकर, सहा आयुक्त श्याम कापसे, सहा. विधी अधिकारी सुरज पारोचे, जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, अमोल तपासे, जितेश धकाते व इतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच सीताबर्डी मानस चौकातील व सतरंजीपूरा चौक येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्य पुतळयाला माल्यार्पण करण्यात आले, मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.