– रविवार दि.१६ मार्च ते रविवार दि.६ एप्रिल २०२५.
कन्हान :- श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हा न व्दारे श्री साई ची छोटीशी सेवा म्हणुन श्रीराम नवमी उत्सवा निमित्य इंदिरा नगर कन्हान येथुन आज भव्य मिरवणुक पालखी व पदयात्रा शिर्डी करिता प्रस्थान होणार आहे.
तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन ।
साईबाबा मी शिर्डीला पायी चालत येईन ।।
दरवर्षी प्रमाणे १५ व्या वर्षी श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान व्दारे श्रीराम नवमी उत्सवा निमित्य रविवार दि.१६ मार्च ते रविवार दि.६ एप्रिल २०२५ कन्हान ते शिर्डी पालखी व पदयात्रा रविवार (दि.१६) मार्च ला सकाळी ११ वाजता श्री साई मंदिर इंदिरा नगर तारसा रोड कन्हान येथुन भव्य मिरवणुक पालखी व पदयात्रा शिर्डी करिता प्रस्थान होणार आहे. याप्रसंगी अजय ठाकरे, रुपाली ठाकरे, मनोज चिकटे वंदना चिकटे, साई ठाकरे भार्गव ठाकरे यांच्या वतीने अन्नदानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . सतत २१ दिवस पालखी दिनचर्या – सकाळी ५.३० वाजता काकड आरती, सकाळी ६.३० वा. मंगलस्नान व अभिषेक, दुपारी १२ वा. मध्यान्ह आरती, नैवेद्य, दुपारी ४.३० वा. साई गुरूपाठ अभंग, सायंकाळी ६.४५ वा. धूपआरती, नेवेद्य, रात्री १०.३० वा.शेजारती आणि रविवार (दि.३०) मार्च गुडीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर साई सच्चरित्र साप्ताहिक पारायणाचे आयोजन केले आहे.
कन्हान ते शिर्डी पालखी पदयात्रेच्या यशस्विते करिता आयोजक नरेश बर्वे, मनोज चिकटे, अजय ठाकरेे, महेश काकडे, गणेश हटवार, चेतन अंबागडे, सतिश मूळे, आकाश गिरडकर, प्रमोद काकडे, मिलींद पोपटकर, अविनाश रायपुरे, अनिल विश्वकर्मा, प्रविण माने, अविनाश जोरनकर, पंकज मूळे, साई ठाकरे, प्रविण पोपटकर, गौरव गिरडकर, अनिल नेवार सह श्री साईराम पालखी सोहळा समिती कन्हान जि. नागपुर चे सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच साई भक्त सहकार्य करित आहे.