संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यातील ग्रामीण भागात मागील काही महिन्यांपासून वाघ आला …गेला…असे वार्ता कायम असून बऱ्याचदा गायीचे भक्षण झाल्याच्या घटना निदर्शनास आले.नुकतेच एक दिवसा आधी कढोली गावात वाघाच्या पायखुना वरून गावात वाघ व त्याचा पिल्लू असल्याच्या चर्चेला विराम मिळत नाही तोच आज आजनी गावातील पांदण रस्त्यावर दिवसा ढवळ्या वाघ आल्याचे एका गावकरी ला दिसताच त्याने सावधगिरी बाळगून त्वरित शेळ्या घेऊन पसार होण्यात यश गाठले परिनामी दुर्दैवी जिवीतहानी घटना टळली.
घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलिसांनी घटनास्थळ गाठून घटनेची नोंद केली असून वनविभागाकडे माहिती देण्यात आली.या गावाच्या लगत शाळा असून नागरिकांची रेलचेल कायम असते तेव्हा सावधगिरीचा ईशारा देण्यात आला आहे.