अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त 20 लाख लिटर दूधाचे संकलन करावे -दूग्‍ध व्‍यवसाय विकासमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील

मुंबई :- राज्‍यातील अतिरिक्‍त दूधाचा प्रश्‍न सोडविण्‍यासाठी अमुल उद्योग समुहासह इतरही प्रक्रिया केंद्रानी अतिरिक्‍त 20 लाख लिटर दूधाचे संकलन करावे, असे आवाहन दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले आहे. या प्रक्रिया केंद्रानी सहकार्य केल्‍यास राज्‍यातील दूध उत्‍पादकांना 35 रुपये भाव देणे शक्‍य होईल असा विश्‍वासही त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

राज्‍य सरकारने दूधाच्‍या दरासंदर्भात घेतलेला निर्णय राज्‍यात तातडीने लागू करता यावा, यासाठी राज्याचे महसूल, पशूसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री विखे पाटील यांनी विशेष प्रयत्‍न सुरु केले आहेत. त्‍यामध्‍ये प्रामुख्‍याने राज्‍यासह बाहेरच्‍या राज्‍यात जाणा-या दूधाला सुध्‍दा शासनाने लागू केलेले दर मिळावेत, यासाठी मंत्री विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात दूध व्‍यवसायिक आणि सर्व प्रक्रिया केंद्राच्‍या प्रमुखांच्‍या बैठकीचे आयोजन करण्‍यात आले होते. या बैठकीला अमूल, पंचमहाल, युनियन, कैरा युनियन, वलसाड, सुमूल आणि भरुज येथील युनियनचे प्रतिनिधी यांच्‍यासह दूग्‍ध व्‍यवसाय विकास विभागाचे आयुक्त प्रशांत मोहोड आणि विभागाचे आधिकारी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांनी या सर्व प्रतिनिधींशी संवाद साधताना दूध उत्‍पादक शेतक-यांना 3-5, 8-5 फॅटसाठी शासनाने ठरवून दिलेला 35 रुपयांचा दर लागू करावा असे आवाहन केले. दर लागू करण्‍यासाठी काही अडचणी असल्‍यास विभागाकडून सोडविण्‍यासाठी निश्चित पुढाकार घेतला जाईल, अशी ग्‍वाही त्‍यांनी दिली. ज्‍याप्रमाणे राज्‍यातील प्रक्रिया केंद्राना दूध पावडर उत्‍पादनासाठी दिले जाणारे अनुदान परराज्‍यातील प्रक्रिया केंद्रानाही मिळावे, अशी मागणी उपस्थित प्रतिनिधींनी केल्‍यानंतर याबाबत सरकार सकारात्‍मकतेने विचार करेल, असे त्‍यांनी सांगितले.

सद्य परिस्थितीत राज्‍यात अतिरिक्‍त दुधाचा प्रश्‍न निर्माण झाल्‍याने यावर तोडगा काढण्‍यासाठी प्रक्रीया केंद्रानी 20 लाख लिटर दूधाचे संकलन करण्‍यासाठी सहकार्य करावे, त्‍यामुळे शेतक-यांच्‍या दूधाचा प्रश्‍न मार्गी लागला जाईल. यामुळे होणारे आर्थिक नुकसानही टळेल अशी अपेक्षा व्‍यक्‍त करतानाच दूधाला हमीभाव मिळावा, यासाठी राज्‍य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्‍ताव पाठविला असून,केंद्र सहकार मंत्री अमीत शाह यांची आपण व्‍यक्तिगत भेट घेवून याबाबत लवकरच धोरणात्‍मक निर्णय घेण्‍याची विनंती केली असल्‍याचे विखे पाटील यांनी बैठकीत सांगितले.

राज्‍यातील दूध उत्‍पादक शेतक-यांच्‍या हितासाठी सरकार आतिशय संवेदनशिल असून, दूधाला जास्‍तीत जास्‍त भाव देण्याच्या दृष्टीने प्रयत्‍न केले जात आहेत. दूध उत्‍पादक शेतक-यांच्‍या प्रश्‍नासाठी सर्व पातळीवर उपाय योजना करण्‍याचे काम सुरु असल्‍याचे दूग्‍ध व्‍यवसाय विकास मंत्री विखे पाटील म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सेतू केंद्रातून दाखले मिळत नसल्याने नागरिकांचा मनस्ताप - माजी जी प सदस्य अनिल निधान

Fri Jul 19 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना व शाळा महाविद्यालय प्रवेशासाठी विविध दाखले काढण्यास तहसील कार्यालयातील सेतू केंद्रात नागरिकांची एकच गर्दी दिसून येत आहे.मात्र या सेतू केंद्रातून 2 जुलै पासून उत्पन्नाचे दाखले अडकले असून तंत्रिकीय अडचण असल्याचे सांगून अर्जदारांना आल्यापायी उलटपायी पाठवतात त्यातच काहींना हाताशी धरून कुठलेही तंत्रिकीय कारण न सांगता सहजरित्या दाखले देण्याचा प्रकार सुरू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!