नवी मुंबई :- कोकण विभागीय स्तरावर नमो महारोजगार मेळावा 6 व 7 मार्च रोजी ठाणे जिल्हयात होणार असून नमो महारोजगार मेळावा यशस्वी होण्यासाठी सर्व विभागामध्ये समन्वय ठेवून नियोजन करावे विभागीय आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी जिल्हाधिकारी ठाणे यांना पत्रकान्वये सूचना दिल्या आहेत.
उपआयुक्त कौशल्य, उद्योजकता व नाविण्यता विभाग यांनी 50 हजार उमेदवारांचे रजिस्टेशन पुर्ण केले असून 781 कंपन्यांनी प्रतिसाद देऊन 79 हजार रिक्त पदे असल्याचे नमूद केले आहे. तसेच त्यांकरीता 352 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. पंरतू जागेची उपलब्धता पाहता 50 हजार रजिस्टेशन झालेल्या उमेदवारांनासाठी गर्दी नियत्रिंत करण्यासाठी उपयोजना व नियोजन करावे. अशा सूचना डॉ.कल्याणकर यांनी दिले आहेत. मेळावाच्या अनुषंगाने विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी तसेच उमेदवार येणार असल्याने त्यांच्यासाठी पुरेशे टॉयलेट, पिण्याच्या पाण्याचे सोय, बसण्यासाठी मंडपाची व्यवस्था करावी. तसेच हा मेळावा यशस्वी होण्यासाठी मेळावाचे कामकाजाचे समन्वय व परिवेक्षणासाठी विभागीय स्तरावर 15 अधिकारांची टिम तयार करण्यात आली असून त्या अनुषंगाने करावयाचे कामकाजाचे वाटप दि.19 फेब्रुवारी 2024 च्या परिपत्रकांन्वये करण्यात आलेले आहे. सर्व विभागाच्या समन्यवयाने नमो स्वयं रोजगार यशस्वी करावे असे विभागीय आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी सांगितले.