संदीप बलवीर,प्रतिनिधी
– मातंग, चर्मकार व ओबीसी समाज धम्म मेळावा संपन्न
– सत्यशोधक समाज महासंघाचे आयोजन
नागपूर :- भारतातील मातंग, चर्मकार व ओबीसी समाजाची जळनघळन फार वेगळी असून, हे लोक हिंदू धर्माच्या गटार गंगेत लोळून लोळून गुलाम झालेले आहे.त्यामुळे हिंदू धर्मात समाविष्ट असूनही अजूनही या देशातील मातंग, चांभार समाज गावकुसाबाहेर खितपत पडला आहे.त्यामुळे त्यांची कुठलीही सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रगती झाली नाही,कारण हिंदू धर्मात देव हा केंद्रबिंदू आहे तर बौद्ध धम्मात माणूस हा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे बुद्ध हा स्वर्गाकडे जातो असे सांगत नसून तो सदाचारन सांगतो.त्यामुळे अंधश्रद्धा वाढविणाऱ्या प्रतिकांचा त्याग करून सामाजिक क्रांती करणाऱ्या बौद्ध धम्माचा स्वीकार करा. कारण बौद्ध धम्म स्वीकारणे म्हणजे माणूस बनने होय.असे उदगार सत्यशोधक समाज महासंघाचे विदर्भ सल्लागार जी एस कांबळे यांनी संदेश सिटी, जामठा येथे संपन्न झालेल्या मातंग, चर्मकार व ओबीसी समाज धम्म मेळाव्यात उपस्थित सर्व धर्मांतरित नवदीक्षितांना मार्गदर्शन करतांना काढले.
सत्यशोधक समाज महासंघ व विश्वशांती सामाजिक न्याय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि २३ ऑक्टो ला जामठा जवळील संदेश सिटी येथे मातंग, चर्मकार व ओबीसी समाज धम्म मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.हजारो वर्षाची गुलामी मोडून,जनावरापेक्षाही बत्तर जीवन बदलून माणसाला माणुसपण बहाल करण्यासाठी मृतवत पडलेल्या माणसांच्या हजारो वर्षाच्या गुलामीच्या शृंखला तोडण्याचे कार्य करणारे विश्वरत्न,भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी नागांची नागभूमी नागपूर येथे १४ ऑक्टोबर १९५६ ला बौद्ध धम्माची दिक्षा देऊन केले.म्हणून ज्या अश्पृश समाजाने बौद्ध धम्माची दिक्षा घेतली त्यांची आज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती ही फार लक्षनीय असून बौद्धिक व वैचारिक दरारा आहे. हीच बाब हेरून राज्यातील लातूर, जालना व यवतमाळ जिल्ह्यातील मातंग, चर्मकार व ओबीसी समाजातील जवळपास शेकडो कुटुंबानी स्वमर्जीने बुद्ध धम्माची दिक्षा घेतली.या धर्मांतर केलेल्या बांधवानी “चलो बुद्ध कि ओर” चा नारा देत महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर व दीक्षाभूमी या पवित्र भूमिला वंदन करण्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिनी नागपूर येथे आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून भारतीय बौद्ध महासंघ,लातूर च्या कोषाध्यक्ष ज्ञानेश्वरी बटवाड, प्रमुख अतिथी म्हणून सत्यशोधक समाज महासंघाचे विदर्भ सल्लागार जी एस कांबळे,पीपल्स पँथर चे प्रदेशाध्यक्ष डॉ भीमराव मस्के,आंबेडकरी विचारवंत प्रा नेणंता टिपले, धम्मचारी आर्यकीर्ती, विनय सागर, मैत्रेयसागर, प्रा राहुल गायकवाड आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्मप्रचारक चंद्राबाबू ठाकरे, प्रास्ताविक सत्यशोधक समाज महासंघाचे राज्य अध्यक्ष डी एस नरसिंगे तर आभार गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता सर्वश्री चंद्राबाबू ठाकरे,चंदू मुन, अरविंद नारायने, मुन गुरुजी, संजय पाटील,दिवाकर मेश्राम, सुमित कांबळे, कैलास पोटफोडे,संजय राऊत आदीने परिश्रम घेतले.