नागपूर :- महाराष्ट्र पॉवरलिफ्टिंग असोसिएशन आणि राष्ट्रीय पॉवरलिफ्टर्सच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्य सबज्युनियर, ज्युनियर, सिनियर व प्रौढांच्या पॉवरलिफ्टिंग, बेंचप्रेस, डेडलिफ्ट स्पर्धेत नागपूरच्या के. सेल्विन नाडार, विपुल राज, मयूर टेकाडे, करण पागोरे, व युजिन एरोलने आपापल्या गटांत किताब पटकावून छाप सोडली.
मोमिनपुरा येथील अन्सार कम्युनिटी हॉलमध्ये बुधवारी संपलेल्या या स्पर्धेतील पॉवरलिफ्टिंगमध्ये नाडारने (३८४ गुण) स्ट्रॉंग मास्टर्स, चंद्रपूरच्या अमित येरपुडेने (४२९ गुण) स्ट्रॉंग बॉय आणि मुंबईच्या चैतन्य पेंडेकरने (३६० गुण) स्ट्रॉंग बॉय किताब जिंकला.
तर बेंचप्रेसमध्ये विपुलने (८० गुण) सुपर टीन, मयूरने (९६ गुण) सुपर बॉय व नवी मुंबईच्या किरण पाटीलने (८४ गुण) सुपर मास्टर्स किताबावर नाव कोरले. याशिवाय डेडलिफ्ट स्पर्धेत करणने (१४० गुण) रॉ टीन बॉय, अकोल्याच्या विशाल कंडेराने (१४८ गुण) रॉ बॉय आणि युजिनने (१५४ गुण) मास्टर्स रॉ किताब जिंकला.
अंतिम निकाल (विजेते) :
डेडलिफ्ट- ५९ किलो : हेमंत मडावी (चंद्रपूर), ६६ किलो : हाजी राफे (नागपूर), ७४ किलो : शेख रिझवान (नागपूर), ८३ किलो : पलविंदर सैनी (मुंबई).
बेंचप्रेस –५९ किलो : नीलेश हिंगे (नागपूर), ६६ किलो : शक्ती पात्रे (नागपूर), ७५ किलो : हर्षल नानोटकर, ८३ किलो : पलविंदर सैनी (मुंबई).
पॉवरलिफ्टिंग- ५९ किलो : अमित सहारे (चंद्रपूर), ६६ किलो : नितीन पेंदाम (चंद्रपूर), ७४ किलो : रोहन मानकर, ८३ किलो : पलविंदर सैनी (मुंबई).
मास्टर्स- ६६ किलो : किरण पाटील (मुंबई), ७४ किलो : युजिन एरोल (नागपूर), ८३ किलो : भारती धासान, १२० किलो : रौनक राजन.