रामधाम येथे आजपर्यंत १२६६ जोडप्यांचे निशुल्क शुभमंगल सावधान

– रामधामचा उत्सवामधून १ निशुल्क सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा

– चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधामचा उत्कृष्ठ उपक्रम

रामटेक :- नागपुर – जबलपुर महामार्गावर असलेल्या मनसर येथील रामधाम येथे चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम (मनसर), आधार बहुउद्देशीय संस्था नागपूर, महिला व बाल विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य निशुल्क सर्वधर्मीय सामुहीक विवाह सोहळा  दि. २९ एप्रील ला मोठ्या थाटात पार पडला. यादरम्यान बैलबंडीवरून वरात काढणे, विविध धर्माच्या विविध पद्धतिने विवाह संपन्न करणे आदी. बाबी पार पडल्या. यावेळी परिसरातील मोठा जनसमुदाय रामधाम येथे उपस्थित होता.

दरम्यान रामधाम तीर्थ मनसर येथे आयोजित निशुल्क आदर्श सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे अध्यक्ष म्हणुन सुनील केदार माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार सावनेर हे तर प्रमुख उपस्थितीमध्ये चंद्रपाल चौकसे (संस्थापक, रामधाम तीर्थ मनसर), संध्या चंद्रपाल चौकसे (संस्थापिका, रामधाम तीर्थ मनसर), गौरव चंद्रपाल चौकसे, सूर्यपाल चौकसे, महिपाल चौकसे, दीपाली चौकसे हे होते. दरम्यान सकाळी ११ च्या सुमारास ग्रा.प. मनसर येथून ५५ नवरदेवाची वरात ट्रॅक्टर वर, डी.जे.पड, बँड, आदिवासी नुत्य, व नाचत-गाजत वरात काढण्यात आली. यामध्ये ५५ जोडप्यांचे ( १ बोद्ध समाज, १० हिंदू समाज व ४४ आदिवासी) समाजाचे विवाह त्यांच्या रितिरिवाजाप्रमाणे लग्न लावण्यात आले. यानंतर चंद्रपाल चौकसे लोकसेवा प्रतिष्ठान रामधाम मनसर तर्फे सर्व नवदाम्पत्यास भेटवस्तू देण्यात आल्या. अध्यक्षीय भाषणात राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री सुनील केदार आमदार सावनेर विधानसभा यांनी आपले भाषणात म्हटले की चंद्रपाल चौकसे व त्यांचा चौकसे परिवार यांनी आपले जीवनात अखंड समाज सेवेचे जिवंत उदाहरण या विवाह सोहळ्याचा माध्यमातून प्रस्तुत केलेले आहे हे नेहमीच समाजकार्य करतात त्यांचा या कार्याला मी आवर्जून उपस्थित राहतो हे करित असलेल्या कार्याला तोड नाही त्यांचा या कार्याला व वर वधुना मी शुभेच्छा देतो. यावेळी प्रामुख्याने दयाराम राय (राष्ट्रीय अध्यक्ष, पंचायती राज सरपंच संघटन), रश्मि बर्वे (माजी अध्यक्षा जी.प. नागपुर), हुकूमचंद आमधरे (सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई),संजय पवार (अध्यक्ष, आधार बहुुद्देशिय संस्था नागपुर), शंकऱ चहांदे (माजी जी.प. सदस्य नागपुर), करुणा  भोवते (उपसभापती पं.स. पारशिवनी), कला ठाकरे (माजी सभापती पं.स. रामटेक तथा सदस्य पं.स. रामटेक), अस्विता  बिरणवार सदस्य पं.स. रामटेक), अनिल पेंगरेकर, डॉ. वैशालि चोपडे, महेश बमनोटे (माजी सभापती), पी.टी. रघुवंशी, बबलू दुधबर्वे, नासिर शेख, शोभा राऊत (माजी नगराध्यक्ष, रामटेक), संजय बिसमोगरे माजी नगरसेवक रामटेक), शारदा बर्वे,  विमल नागपुरे, रंजना मस्के,कांचनमाला माकडे, हेमंत जैन, बन्सीलाल बमनोटे, शरद गुप्ता, हरिभाऊ तुपट, जयराम महाजन, रामदास मथुरे, मोहन कोठेकर, धर्मेंद्र दुपारे, ताराचंद ठाकरे, देवाजी दुधपचारे, शिवराम महाजन, अजय खेडगरकर, रवी बावनकुळे, रितेश कुमरे, प्रीतम मोहबिया, शिवराम वरठी, मोतीराम खंडाते, तुळसीराम वाडीवे, गणाराम धुर्वे, तिरजू नराठी उपस्थित होते.

मी आईला वचन दिले होते – चौकसे

चंद्रपाल चौकसे यांनी आपले प्रस्तावीक भाषणात म्हटले की आईला दिलेल्या वचनाप्रमाणे आपल्या उत्पनातून कमीत-कमी १०% रकम ही समाजकार्यासाठी खर्च करतो त्यामुळे कोणतेही कर्ज न घेता दरवर्षी ज्यांची लग्न करायची आर्थिक परिस्थिती नाही अशा हजारो जोडप्यांचे येथे निशुल्क लग्न लावण्यात येते. विदर्भातील हा एकमेव विवाह सोहळा आहे जो सतत मागील १५ वर्षांपासून सुरु आहे. येथे लग्नात आलेल्या हजारो लोकांना स्वादिस्ट भोजन देण्यात येते. आजपर्यंत येथे १२६६ विवाह संपन्न झालेले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज महाराष्ट्र दिवस विशेष : महाराष्ट्र राज्य का गठन कब और कैसे हुआ 

Mon May 1 , 2023
मुंबई /नागपुर :- जिसे आमतौर पर महाराष्ट्र दिवस (मराठी: महाराष्ट्र दिवस) के रूप में जाना जाता है, भारतीय राज्य महाराष्ट्र में एक राज्य अवकाश है, जो भारत में महाराष्ट्र राज्य के गठन की याद दिलाता है। 1 मई 1960 को बंबई राज्य के विभाजन से बना है महाराष्ट्र। देश को आजादी के उपरान्त मध्य भारत के सभी मराठी इलाकों का संमीलीकरण […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com