अमरदिप बडगे
गोंदिया – गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गावर कोरंभी राखीव वनक्षेत्रात कक्ष क्रमांक 260 मध्ये रेल्वेच्या धडकेत पट्टेदार वाघाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या दरम्यान घडली आहे.
सकाळी रेल्वे कर्मचारी गस्त करिता असताना मृत वाघाचा शव दिसल्याने घटना उघडकीस आली आहे. मृत पट्टेदार वाघाचे वय अंदाजे 6 ते 7 वर्ष सांगण्यात येत आहे. रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याचा सध्या अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
हि घटना कोरभी ते चारभट्टी गोंदिया बल्लारशा रेल्वे मार्गावरील आहे. सदर घटनेची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वाघाचे सर्व शरीर बरोबर असुन रेल्वेच्या धडकेत कंबर व डाव्या पायाची मांडी तुटलेली दिसुन येत आहे तसेच रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मृत वाघाचे शवविच्छेदन वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठविले असून घटनास्थळी वनविभागाचे उपवनसंरक्षक कुलराजसिंह वनविभागाचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.