बेला :- बेला नजीकच्या आदिवासीबहुल कोहळा येथील बीट कक्ष क्र. 326 सुरक्षित वनातील वाघाने एका दोन वर्षीय गायीची शिकार केल्याची घटना बुधवार १५ डिसेंबरला दुपारी 2 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
मिळालेल्या माहितीनुसार कोहळा येथील रितेश मधुकर आत्राम यांची अंदाजे दोन वर्षाच्या गायीला नेहमीप्रमाणे जंगलात चरायला गुराखी घेऊन गेला होता. दुपारी दोनच्या सुमारास गुराख्याला जंगलात पट्टेदार वाघ दिसला. त्यामुळे तो घाबरला. त्याने गोधन सोडून गावात पलायन केले. व गावात वाघाची माहिती दिली. या दरम्यान पट्टेदार वाघाने गायीवर हल्ला करून शिकार केली. तो वाघ जंगलात निघून गेला. गुराख्याने विभागीय वन अधिकारी यांना फोन करून या घटनेची माहिती दिली. त्यामुळे वन अधिकारी लगेच घटनास्थळी वाघाचा आणि गाईचा शोध घेण्यास निघाले. या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला होता. वन अधिकारी आमघाटचे क्षेत्र सहाय्यक ए.व्ही.जनावर, वनरक्षक एस.के.कुलरकर आणि हंगामी वन मजदूर दिनेश मसराम यांनी पंचनामा करून घटनास्थळी कॅमेरे लावले. पशु मालक रितेश आत्राम यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले.