नागपूर :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या आज दुस-या दिवशी काटोल, नागपूर उत्तर आणि नागपूर पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून प्रत्येकी एक याप्रमाणे तीन नामनिर्देशपत्र दाखल करण्यात आले.
नागपूर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विनील रमेश चौरसिया (अपक्ष), नागपूर उत्तर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघातून संतोष तुळशीराम चव्हाण (विकास इंडिया पार्टी) तर काटोल विधानसभा मतदारसंघातून लिलाधर मारोतवार कुडे (अपक्ष) या उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 29 ऑक्टोबर ही नामनिर्देशपत्र सादर करण्याची अंतिम मुदत आहे. 30 ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. 4 नोव्हेंबर ही अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
274 अर्जांची उचल
जिल्ह्यातील 12 विधानसभा मतदारसंघात एकूण 274 अर्जाची उचल करण्यात आली. काटोल, 22, सावनेर – 22 , हिंगणा –25, उमरेड 22, नागपूर दक्षिण पश्चिम – 13, नागपूर दक्षिण –29 , नागपूर पूर्व – 27, नागपूर मध्य – 22, नागपूर पश्चिम – 30, नागपूर उत्तर 21, कामठी – 24, रामटेक – 17 अशा एकूण 274 अर्जांची उचल करण्यात आली. दि. 22 ऑक्टोबर रोजी 462 अर्जांची उचल करण्यात आली होती.