नागपूर :- विभागीय आयुक्तालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारी प्राप्त झाल्या. या तक्रारींबाबत उचित कार्यवाहीचे आदेश कुलकर्णी यांनी संबंधीत शासकीय यंत्रणांना दिले.
भंडारा जिल्ह्याच्या मांडवी तालुक्यातील कोटांगले येथील नागरिकाची नैसर्गिक नाला व पाणंद रस्त्यावरील अतिक्रमण आणि नैसर्गिक आपत्तीबाबत जुन्या तक्रारी आणि नागपुरातील गांधी झोन मधील अतिक्रमणाबाबत दोन तक्रारींवर आज सुनावणी झाली.
कोटांगले येथील तक्रारीबाबत अर्जदाराकडूनच शासकीय जमीनीवर अतिक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या अन्य एका तक्रारीनुसार नैसर्गिक आपत्तीचा मोबदला देण्यात नआल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात स्थानिक नायब तहसिलदार यांनी संबंधित नुकसानीबाबतचे पंचनामे आजच्या बैठकीत सूपूर्द केले. नागपूर महानगरपालिकेबाबत नझुल जागेवरीलअतिक्रमणाचाविषय संबंधित तहसिलदारांकडून प्राप्त लेखी माहितीच्या आधारे सोडविण्यात येणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर या दोन्ही प्रकरणातील तक्रारदार अनुपस्थित होते.