नागपूर :- जय-दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर , आयोजित “साई चरण पादुका दर्शन सोहळ्याला हजारो साई भक्तांनी हजेरी लावली आणि श्री साईबाबा ह्यांनी वापरलेल्या पादुकांचे दर्शनाचा लाभ सर्व राणाप्रताप नगर अर्थात टेलिकॉम नगर, रामकृष्ण नगर, सेंट्रल एकसाइज कॉलनी, गावंडे ले आउट आणि रवींद्र नगर ,दीनदयाल नगर, गणेश कॉलनी , शांतिनिकेतन कॉलनी वासियांनी घेतला. साईबाबाच्या ह्या त्याच पादुका होत ज्या त्यांनी श्री साई परमभक्त म्हाळसापती ह्यांना दिल्या होत्या.
उपमुख्यमंत्री ह्यांचे मानद सचिव तसेच माजी महापौर संदीप जोशी, राणाप्रताप नगर चे पोलीस इन्स्पेक्टर काळे, माजी नगरसेवक दिलीप दिवे, गोपाल बोहरे, माजी नगरसेविका पल्लवी शामकुळे तसेच इतर हजारो साईभक्तांनी चरण पादुका दर्शनाचा लाभ घेतला.
जय दुर्गा उत्सव मंडळ चे प्रदीप चौधरी ह्यांनी साई -पादुका चे हनुमान मंदिर प्रांगणात स्वागत केले. याप्रसंगी मंडळाचे अमोल लोहट, प्रकाश नाजपांडे, प्रभाकर चौधरी, सुरेश रेवतकर , नितीन नायडू , जयंत घारे, प्रसन्न ब्रम्हे, विनय फडणवीस, शैलेश अगस्ती, प्रवीण दाणी, जीवन मुदलियार,भास्कर गवळी, सिद्धेश नाजपांडे, गिरीश चौधरी आणि सचिन द्रवेकर प्रामुख्याने उपस्थित होते.
जय-दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर, गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने आणि उत्साहाने पारंपारिक पद्धतीने पारिवारीक तसेच पर्यावरणपूरक असा नवरात्री उत्सव साजरा करीत आहे. फक्त नवरात्री उत्सव च नव्हे तर २०२२-२३ ह्या वर्षभर कालावधीत जय दुर्गा उत्सव मंडळ तर्फे वर्षभर विविध सामाजिक तसेच कार्यक्रम राबविण्यात आले, ज्या मध्ये जागतिक महिला दिन आणि टेलिकॉम नगर मधील वरिष्ठ महिलांचा सन्मान कार्यक्रम, गुढी पाडवा निमित्य महिलांची स्कूटर रॅली, तसेच सर्वासाठी शेगाव तीर्थाटन यात्रा इ .
प्रख्यात गायिका, सोशल वर्कर आणि बँकर अमृता फडणवीस (उप- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या सौभाग्यवती ) ह्या जय दुर्गा उत्सव मंडळ, टेलिकॉम नगर येथे Oct 21 (Saturday )रात्री ९.१५ ते ९.३० दरम्यान भेट देणार आहेत.