संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- महाराष्ट्र शासन ‘क’ श्रेणी तीर्थक्षेत्र श्री साईबाबा मंदिर आडापुल कामठी येथे वार्षिक साई बाबा महोत्सवाच्या पर्वावर हजारो भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेतला मंदिराचे संस्थापक श्रीकृष्ण देवनाथ बाबा यांचे हस्ते दहीहंडी फोडून महाप्रसाद कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पुरुष व महिलासाठी स्वतंत्र भोजन व्यवस्था करण्यात आली होती दोन्हीही काउंटरवर हजारोच्या संख्येने पुरुष महिलांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
महाप्रसादाला रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने ,रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल ,कामठीचे आमदार टेकचंद सावरकर, नागपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक, नागपूर जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष सुरेश भोयर ,कामठी नगर परिषदेचे माजी अध्यक्ष शकूर नागानी, कमल यादव, कन्हान, मन्सर ,रामटेक, तारसा, कामठी, गुंमथाळा,आजनी, गादा नेरी ,नागपूर परिसरातून हजारो भक्त सहभागी झाले होते.
महाप्रसादाला लागणारे सर्व साहित्य भक्त स्वतःहून गोळा करीत असतात महाप्रसादाचे यशस्वी आयोजनासाठी मनोहर मन्सूरकर, नरेश बर्वे ,उमाशंकर सिंग ,दिलीप बडवाईक, गणेश यादव, मोरया, राम नारायण, सुदेश अग्रवाल, लाला खंडेलवाल ,जेता फुले ,अनिल नेवारे, राजू बुटांनी, सुदाम राकडे ,सुषमा राखडे, रवी उरकुडे आदींनी परिश्रम घेतले महाप्रसादा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता जुनी कामठीचे ठाणेदार दीपक भिताडे यांच्या मार्गदर्शनात मोठ्या प्रमाणात कडक पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.