हजारो लाडक्या बहिणींनी केला आमदार देवेंद्र भुयार यांचा सत्कार

– ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना मतदार संघात यशस्वी करू” — आमदार देवेंद्र भुयार 

वरूड :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ या योजनेसारखी अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि महिला भगिनींना दिलासा देणारी योजना महाराष्ट्र सरकारने कार्यान्वित करून विधीमंडळात या योजनेला लागू करण्याचा अध्यादेश जारी करण्यात आला आल्याबद्दल मोर्शी वरूड तालुक्यातील हजारो बचत गटांच्या महिलांनी आमदार देवेंद्र भुयार यांचा सत्कार करून आभार मानले.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे मोर्शी वरूड मतदार संघातील जनतेच्या वतीने आमदार देवेंद्र भुयार यांनी आभार मानले असून ही योजना पूर्ण मतदार संघात यशस्वी करण्यासाठी मतदार संघात प्रयत्न करणार असल्याचा विश्वास आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदार संघातील हजारो बहिणींना दिला.

आमदार देवेंद्र भुयार यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची त्वरित अंमलबजावनी करण्यासाठी एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी मोर्शी वरूड तालुक्यामध्ये माविम आणि उमेद संस्थेमधील महिलांसोबत बैठक घेवून उपाययोजना आखण्यात आल्या त्यामध्ये आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्यासाठी आहार पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण’ अशी योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी तातडीने होणार असून, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे जमा करून त्यासंबंधीचे अर्ज शासनाने नेमून दिलेल्या साईटवर अपलोड करण्यासाठी आमदार देवेंद्र भुयार यांच्या वतीने विशेष सहाय्य योजना केली आहे. या योजनेसाठी १५ जुलै ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे. यातील सर्वांत महत्त्वाचा असणारा उत्पन्नाचा दाखला त्वरित मिळण्यासाठी तहसीलदार कार्यालये व शासनमान्य सेवा केंद्र येथे शिबिरांचे आयोजन करावे, अशी विनंती महसूल यंत्रणेकडे केली आहे.महसूल अधिकारी वर्गानेही या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये कोणताही विलंब होणार नाही, याची ग्वाही दिली असून मतदार संघातील संपूर्ण बहिणींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना मध्यप्रदेश शासनाने २०२२ मध्ये सुरु केली तेव्हापासून मी राज्य शासनाकडे निवेदन देवून चर्चा करून ही योजना आपल्या राज्यात राबविण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे वेळोवेळी केली त्याची दखल घेऊन राज्य शासनाने ही योजना आपल्या राज्यात सुरु करण्याचा निर्णय घेतल्यामुळे लाखो महिलांना याचा लाभ मिळणार असून त्यांना दिलासा मिळाला आहे ही योजना प्रत्यक्ष अंमलात येत असल्याचा मला आनंद आहे.

– आमदार देवेंद्र भुयार

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकऱ्यांचा आर्थिक भार कमी होण्यासाठी प्रयत्न करा - ॲड.निलेश हेलोंडे पाटील

Wed Jul 3 , 2024
– शेती स्वावलंबन मिशनच्या अध्यक्षांकडून आढावा यवतमाळ :- नापिकी आणि कर्जबाजारीपणासोबतच शेतकऱ्यांना गेल्या काही वर्षात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. यापासून शेतकऱ्यांना दिलासा देणे आवश्यक आहे. त्यामुळे विभागांनी शेतकऱ्यांसाठी काम करत असतांना त्यांचा आर्थिक भार कमी कसा होईल यासाठी प्राधान्याने प्रयत्न करावे, असे निर्देश वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड.निलेश हेलोंडे पाटील यांनी दिले. महसूल भवन येथे अध्यक्षांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com