शहरातील ५९ पुतळ्यांची सखोल स्वच्छता

– मनपाच्या अभिनव उपक्रमाला नागरिकांकडून कौतुकाची थाप!

नागपूर :- स्वच्छ, सुंदर आणि हरित नागपूर साकारताना शहरातील विविध चौक, महापुरुषांचे पुतळे, स्मारके स्वच्छ दिसणे अत्यंत महत्त्वाचे आहे. स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियाना अंतर्गत नागपूर महानगरपालिकेद्वारे पहिल्यांदाच सामूहिकरीत्या शहरातील विविध ५९ पुतळे, स्मारक, चौकांची सखोल स्वच्छता करण्यात आली. या अभिनव उपक्रमाला नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दर्शवित मनपाच्या कार्याचे कौतुक केले.

मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल व अजय चारठाणकर यांच्या मार्गदर्शनात नागपूर महानगरपालिकेद्वारे शहरातील विविध स्मारक, पुतळ्यांची स्वच्छता करण्यात आली. यंदाच्या दिवाळीत संपूर्ण शहर स्वच्छ व सुंदर साकारण्यासाठी मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी पुढकार घेत केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ दिवाळी, शुभ दिवाळी’ अभियानाच्या माध्यमातून २१ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान शहरात विविध उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. या अंतर्गत सोमवारी (ता.२८) मनपाच्या दहाही झोनमधील महापुरूष, स्वातंत्र्य सेनानी यांच्या ५९ पुतळ्यांची व चौकांची सखोल स्वच्छता करण्यात करण्यात आली.

मनपाच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांनी शहरातील विविध ठिकाणी भेट देत स्वतः पुतळ्यांच्या स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविला. त्यांनी स्वतः पुतळ्यांच्या सभावातली असणारा कचरा स्वच्छ केला. यावेळी उपायुक्त विजय देशमुख, व घनकचरा विभाग प्रमुख उपायुक्त डॉ. गजेंद्र महल्ले उपस्थित होते.

स्वच्छता मोहिमेत उपायुक्त मिलिंद मेश्राम यांच्या नेतृत्वात लक्ष्मीनगर झोन येथील अजनी चौकातील यशवंतराव चव्हाण, माजी पंतप्रधान राजीव गांधी, दीक्षाभूमी चौकातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यांची सखोल स्वच्छता करण्यात आली. तर उपायुक्त प्रकाश वराडे यांच्या नेतृत्वात धरमपेठ झोन येथील शंकरनगर चौकातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा, गोकुळपेठ चौकातील लालबहादूर शास्त्री यांचा पुतळा, विद्यापीठ ग्रंथालय चौकातील सेनापती बापट यांचा पुतळा, विधानभवन समोर परिसरातील दादासाहेब कन्नमवार, महाराष्ट्र बँक सीताबर्डीतील धर्मवीर डॉ. मुंजे यांचा पुतळा, सीताबर्डी हिंदी मोर भवन येथील झाशी राणी लक्ष्मीबाई यांचा पुतळा, रामदासपेठेतील अर्थ शास्र्रज्ञ के. आर. नायडू यांचा पुतळा, सिव्हिल लाईन्स व्हि सीए परिसरातील सी. के. नायडू यांचा पुतळा, आकाशवाणी चौकातील कायदेपंडित मनोहर रा.बोबडे यांचा पुतळा, रामनगर चौकातील नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचा पुतळा, विद्यापीठ समोर महाराज बाग येथील डॉ. पंजाबराव देशमुख यांचा पुतळा, आनंद टॉकिज सीताबर्डीतील नारायण उईके यांचा पुतळा, सिव्हील लाईन्स माऊंट रोड येथील ॲड.पी.के.साळवे यांचा पुतळा, विधान भवन चौकातील गोंड राजे बख्त बुलंदशाह यांचा पुतळा, फूल बाजार मार्केट समोर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, मनपा मुख्यालयातील बॅरि. शेषराव वानखेडे, अंबाझरी उद्यान परिसरातील क्रांतीगुरू लहुजी साळवे, मानस चौकातील संत गोस्वामी तुलसीदास यांचा पुतळा, वाल्मिकिनगर गोकुळपेठ येथील महर्षि वाल्मीकि स्मारक, अंबाझरी येथील अर्धनारी नटेश्वर पुतळा, अंभ्यंकर नगर येथील बॅरि. मोरूभाऊ अभ्यंकर यांचा पुतळा, बजाज नगर चौकातील जमनालाल बजाज यांचा पुतळाची स्वच्छता करण्यात आली.

तसेच सहायक आयुक्त नरेंद्र बावनकर यांच्या नेतृवात हमनुमानगर झोन येथील मानेवाडा रोड स्थित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुतळा, क्रीडा चौकातील मशाल पुतळा स्वच्छ करण्यात आला. तर सहायक आयुक्त प्रमोद वानखेडे यांच्या नेतृत्वात धंतोली झोन येथील महाल गांधीसागर तलाव परिसरातील लोकमांन्य बाळ गंगाधर टिळक यांचा पुतळा, घाटरोड मोक्षधाम स्थित सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा, फुले मार्केट येथील महात्मा ज्योतीबा फुले यांचा पुतळा, इंदिरानगर कुंदनलाल गुप्ता वाचनालय परिसरातील कुंदनलाल गुप्ता यांचा पुतळा, घाटरोड बस स्टँड समोरील रुपचंद जाधव यांचा पुतळा, कॉटन मार्केटातील तुळशीबाई झुरे यांचा पुतळा, मोक्षधाम येथील अर्धनारी नटेश्वर पुतळा, बालोद्यान गांधीसागर तलाव परिसरातील साने गुरूजी यांचा पुतळा स्वच्छ करण्यात आला. सहायक आयुक्त विजय रायबोले यांच्या नेतृत्वात नेहरूनगर झोन येथील सक्करदरा चौकातील श्रीमंत राजे रघूजी भोसले यांचा पुतळा, न्यू सुभेदार ले-आऊट येथील महात्मा बसेश्वर पुतळा, जगनाडे चौक नंदनवन येथील संत जगनाडे महाराज पुतळा, छोटा ताजबाग सक्करदरा येथील श्रीमती चिमाबाई भोसले पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. तसेच सहायक आयुक्त गणेश राठोड यांच्या नेतृत्वात गांधीबाग झोन येथील चितारओळी गंजीपेठ येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा, टेलीफोन एक्सचेंज चौकातील डॉ. राजेंद्र प्रसाद पुतळा, महाल गांधीगेट येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा , टाऊन हॉल समोर महाल येथील बॅरि. मोरूभाऊ अभ्यंकर, सेंट्रल एव्हेन्यू रोडवरील चंद्रशेखर आझाद पुतळा, झेंडा चौक महाल येथील शहीद शंकर महाले पुतळा, मेयो हॉस्पिटल चौकातील शहीद कृष्णराव काकडे पुतळा, बडकस चौकातील पं. बच्छराज व्यास पुतळा, गांधीबाग उद्यान जवळ विनकरनेते रा.बा.कुंभारे पुतळा, भगत केवलराम, महाल चौकातील त्यागमूर्ती पुनमचंद राका पुतळा, गंगाबाई घाट येथील अर्धनारी नटेश्वर पुतळा स्वच्छ करण्यात आला.

सहायक आयुक्त घनश्याम पंधरे यांच्या नेतृत्तवात संतरंजीपुरा झोन येथील मिरची बाजार इतवारी मस्कासाथ येथील पं. जवाहरलाल नेहरू पुतळा, शांतीनगर वसाहत श्रीमती इंदिरा गांधी, दुर्गावती चौकातील राणी दुर्गावती पुतळा, जागनाथ बुधवारी चौकातील भारत माता पुतळा व परिसर स्वच्छ करण्यात आला. सहायक आयुक्त विजय थुल यांच्या नेतृत्वात वर्धमाननगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली. तर सहायक आयुक्त  हरिष राऊत यांच्या नेतृत्तवात आशीनगर झोन येथील कमाल चौकातील कर्मवीर बाबू आवळे, इंदोरा चौकातील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे पुतळा, दुर्गावती चौक बिनाकीतील राणी दुर्गावती पुतळा स्वच्छ करण्यात आला. मंगळवारी झोन मध्ये सहायक आयुक्त श्री. अशोक घरोटे यांच्ये नेतृत्तवात अंजुमन कॉम्लेक्स समोर सदर येथील बॅरि. सखारामपंत मेश्राम पुतळा, जरीपटका चौकातील शहीद खेमू पुतळा,कस्तूरचंद पार्क येथील कस्तूरचंद डागा पुतळा, व मानस चौकातील सुभाषचंद्र बोस यांचा पुतळा व परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी स्वच्छता कर्मचार्यांनी पुतळा व परिसराची सखोल स्वच्छता केली. तसेच निघालेला कचरा कचरा गाडीतून संबंधित ठिकाणी पाठविला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संक्षिप्त छाननी प्रक्रिया पार पाडावी - निवडणूक निरीक्षक सुनील कुमार

Wed Oct 30 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार येत्या 20 नोव्हेंबरला कामठी मौदा विधानसभा मतदार संघाची सार्वत्रिक निवडणूक होणार असून त्यानुसार 22 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत कामठी तहसील कार्यालय सभागृहात निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे इच्छुक उमेदवारांनी पक्ष व अपक्ष असे एकूण 29 उमेदवारांनी 33 उमेदवारी अर्ज सादर केले आहेत.त्यानुसार कामठी मौदा विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!