– राष्ट्रीय ओबीसी महासंघ ठाकरे – बर्वेंच्या पाठीशी
नागपूर – विविधतेतील एकता हीच आपल्या देशाची ओळख आहे. मात्र सध्या देशभरात एक विशिष्ट विचारांची मक्तेदारी सुरु आहे. त्यामुळे या अहंकारी सत्ताधाऱ्यांना घरी बसविण्यासाठी सर्व बहुजनांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे असे आवाहन माजी मंत्री सुनिल केदार यांनी केले. महाकाळकर सभागृह येथे प्रा. बबनराव तायवाडे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि विविध जाती संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.
सर्व संघटनांनी एकमताने इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नागपूर लोकसभेचे अधिकृत उमेदवार विकास ठाकरे आणि रामटेक लोकसभेचे उमेदवार श्यामकुमार बर्वे यांना पाठींबा जाहीर केला. यावेळी प्रामुख्याने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह आमदार सुधाकर अडबाले, गिरीश पांडव, धूनेश्र्वर पेठे, अशोक धवड, देवराव रडके, प्रफुल गुडधे पाटील, अतुल लोंढे पाटील, सुभाष मानमोडे, किशोर कुमेरिया, तानाजी वनवे, नितीन कुंभलकर, परमेश्वर राऊत, शरद वानखेडे यांची उपस्थिती होती.
आमदार अभिजीत वंजारी यांना पद्वीधर निवडणूकीत ज्या पद्धतीने बहुजन समाजाने पाठींबा दिला होता, त्याच आधारावर तेली समाजही विकास ठाकरे यांना पाठिंबा देऊन ओबीसींची राजकीय चळवळ आणखी सक्षम होणार असल्याचा विश्वास ११ एप्रिल रोजी आयोजित स्नेहमिलन सोहळ्यात तेली समाज बांधवांनी व्यक्त केला होता.
दक्षिण नागपूरात जन आशीर्वाद यात्रेला उदंड प्रतिसाद
शनिवारी सकाळी महाकाळकर भवन येथून दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघातून यात्रेची सुरुवात झाली. त्यानंतर छोटा ताजबाग-सुर्वे ले आऊट-चक्रधर नगर- अयोध्या नगर – सेवादल नगर – भांडे प्लॉट- बिडीपेठ- राजीव गांधीनगर-बडा ताजबाग-टिचर्स कॉलनी-तुकाराम चौक-उदयनगर चौक-महालक्ष्मीनगर-जवाहर नगर-चक्रधर नगर मार्गे संजय महाकाळकर यांच्या कार्यालयापर्यंत निघाली.