जनतेचे हित आणि सक्षम महाराष्ट्र करणारा हा अर्थ संकल्प…! – आमदार प्रवीण दटके

आज महायुती सरकारचा अंतरिम अर्थ संकल्प सादर झाला. जनतेच्या अपेक्षांना त्यातल्या त्यात महीला, शेतकरी आणि युवा हे समाजातील महत्त्वाचे घटक लक्षात घेऊन देशाच्या आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाला अनुरूप असा हा अर्थसंकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात अजितदादांनी सादर केला.

अर्थसंकल्पात महिलांना केंद्र बिंदू मानून अनेक योजना शासनाने राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये महिलांसाठी विविध योजना आणून महिला सक्षमीकरणाची मोठी नीव ठेवण्यात आली आहे. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, लेक लाडकी योजना, महिलांसाठी पिंक ई रिक्षा, शुभ मंगल सामुहिक नोंदणीकृत विवाहाच्या माध्यामातून महिलांना प्रोत्साहन, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, अंगणवाडी सेविकांना एक लाख रु. लाभ देणारी योजना, लखपती दिदी, महिला स्टार्ट अप, पर्यटन क्षेत्रात प्रगती करू पाहणाऱ्या महिलांसाठी “आई विशेष योजना”, जल जीवन मिशन अंतर्गत महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबवण्यासाठी “हर घर नल, मिशन हर घर जल” योजना राबविण्यात येणार आहे.

मुल्लींना उच्च शिक्षणासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला असून दोन लाख मुलीना त्याचा लाभ मिळणार आहे. तसेच महिलांमध्ये आढळणाऱ्या स्तनांच्या व गर्भाशयाच्या कर्करोगासाठी 78 हजर कोटी रु. निधी मंजूर करून त्यांना सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एकंदरीत महिलांच्या सक्षमीकरणाचा हा विश्वास शासनाने दिला आहे.

तसेच महाराष्ट्रातील शेतकरी समृद्ध, स्वावलंबी होण्यासाठी शेतकऱ्यांना बी बियाणे, सिंचन सुविधा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, शेतमालाचे मूल्यसंवर्धन, शेतमाल साठवणूक, बाजारपेठेची उपलब्धता मिळावी म्हणून नमो शेतकरी महा सन्मान निधी, एक रुपयात पीक विमा, गोपीनाथ मुंडे शेतकरी सुरक्षा सानुग्रह अनुदान या योजना सुरु करुन शेतकऱ्यांना नवी उमेद शासनाने दिली आहे. आजचा तरुण हा उद्याचं उज्ज्वल भविष्य आहे, अर्थव्यवस्थेच्या वाढीत तरुणांचा फार मोठा वाट आहे. युवा वर्ग अधिक सक्षम, कुशल बनविणे ही आजची गरज आहे. त्यासाठी युवा वर्गाला मुख्यमंत्री, युवा कार्य प्रशिक्षण योजना, रोजगार मेळावा, कौशल्य विकास स्वयंरोजगारासाठी कर्ज या सारख्या योजना देऊ करुन तरुणांना स्वतः ची ओळख व्हावी आणि या देशाच्या विकासात त्यांचे नैतिक योगदान असावे.

दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या दुर्बल घटकांना समाजात जगण्याचा आधार मिळावा आणि त्यांना सन्मानाने जगता याव यासाठी दिव्यांग कल्याण, तृतीय पंथी धोरण, धनगर समाजासाठी भूखंड, महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनांचा लाभ त्यांना मिळणार आहे. राज्यातील शहराचा विकास ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याने या पायाभूत सुविधामध्ये राज्यातील मेट्रोचे जाळे, पी एम ई बस सेवा, ग्रामपंचायत बांधकाम, नागपूर येथील रामटेक विकास आखाडा, बाबा जुमदेवजी स्मारक, संत श्री रुपलाल महाराज यांचे राष्ट्रीय स्मारक, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत या माध्यमातून राज्याच्या विकासाची धुरा शासन समर्थपणे पेलण्यास तत्पर आहे. समाजाच्या कल्याणासाठी शासनाने हा अर्थसंकल्प सादर करून एकूण संपूर्ण महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यावर लक्ष केंद्रित केले आहे. यासाठी मी शासनाचे मनःपूर्वक अभिनंद करतो.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

शेतकऱ्यांना न्याय देणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प, जलयुक्त शिवार अभियान-2 साठी ६५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद - मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

Sat Jun 29 , 2024
यवतमाळ :- राज्याच्या विकासाच्या दृष्टीने शेतकरी, शेतीपूरक व्यवसाय, उद्योग, महिला सक्षमीकरण, शिक्षण, व्यापार, आरोग्य, पर्यटन, विद्यार्थी, युवक, महिला, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक अशा विविध क्षेत्रांच्या विकासाला बळ देणारा वर्ष 2024-25 चा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. जलयुक्त शिवार अभियान-2.0 साठी 650 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com