नवी मुंबई :- भारत निवडणूक आयोगाने दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याबाबतची आदर्श आचारसंहिता दि. 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू झालेली आहे. त्यामुळे शासन सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रकानुसार दि. 11 नोव्हेंबर 2024 रोजीची विभागीय लोकशाही दिन बैठक आयोजित करता येणार नाही. तसेच आचारसंहिता समाप्तीबाबतचे पुढील आदेश प्राप्त होईपर्यंत पुढील प्रस्तावित विभागीय लोकशाही दिन बैठक आयोजित करता येणार नाहीत, असे विभागीय आयुक्त कोंकण विभाग यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.