संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- नुकत्याच 19 एप्रिल ला संपन्न झालेल्या रामटेक लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 28 उमेदवार निवडणूक रिंगणात होते त्यात महाविकास आघाडीचे उमेदवार श्यामकुंमार बर्वे तसेच महायुतीचे उमेदवार राजू पारवे यात थेट निवडणूक लढत झाली असली तरी कांग्रेस चे बंडखोर वंचीत समर्थीत उमेदवार किशोर गजभिये ला मिळणारे मते हे निर्णायक ठरत निवडुन येणाऱ्या व पराभूत होणाऱ्या उमेदवाराला कारणीभूत ठरणार आहेत.नागरिकाच्या चर्चेत कांग्रेस उमेदवाराला बहुमान मतदान झाल्याची चर्चा रंगली असली तरी निवडणूक निकाल येत्या 4 जून ला होणाऱ्या मतमोजनी निकालातून जाहीर होईल.
रामटेक लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश होत असून एकूण मतदारांची संख्या 20 लक्ष 49 हजार 85 आहे ज्यामध्ये 10 लक्ष 44 हजार 891 पुरुष मतदार तर 10 लक्ष 4 हजार 142 स्त्री मतदार व 52 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे यातील 12 लक्ष 49 हजार 864 मतदारांनी हक्क बजावला ज्यामध्ये 6 लक्ष 66 हजार 302 पुरुष तर 5 लक्ष 83 हजार 356 मतदार तसेच 6 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. यानुसार एकूण 61 टक्के मतदान झाले आहे.या सहाही विधानसभा मतदार संघातील मतदारांची मतदान संख्याचा विचार केला असता काटोल विधानसभा मतदार संघात एकूण 2 लक्ष 73 हजार 814 मतदारांचा समावेश असून झालेल्या 62.96 टक्के मतदानानुसार एकूण 1 लक्ष 72 हजार 390 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.सावनेर विधानसभा मतदार संघात एकूण 3 लक्ष 14 हजार 605 मतदार संख्या आहे त्यातील 61.44 टक्के मतदानानुसार 1 लक्ष 93 हजार 298 मतदारांनी मतदान केले ,हिंगणा विधानसभा मतदार संघात 4 लक्ष 24 हजार 158 मतदार संख्या असून 54.16टक्के मतदानानुसार 2 लक्ष 29 हजार 722 मतदारांनी मतदान केले.उमरेड विधानसभा मतदार संघात 2 लक्ष 93 हजार 829 मतदारांचा समावेश आहे ज्यामध्ये 67.16टक्के झालेल्या मतदानात 1 लक्ष 97 हजार 341 मतदारांनी मतदान केले. रामटेक विधानसभा मतदार संघात एकूण 2 लक्ष 76 हजार 448 मतदार असून 66.37टक्के झालेल्या मतदानानुसार 1 लक्ष 83 हजार 485 मतदारांनी मतदान केले तसेच कामठी विधानसभा मतदार संघातील एकूण 508 मतदान केंद्रावर एकूण 4 लक्ष 66 हजार 231 मतदारांपैकी 2 लक्ष 73 हजार 628 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला यानुसार 58.69टक्के मतदान झाले.
-मतदान यंत्रणा च्या चुकीच्या धोरणामुळे कामठी विधानसभा मतदार संघातील बहुतेक मतदार यादीत घोळच घोळ दिसुन आला.मतदार यादीत दुबार तीबार नावे असणे, मतदार जिवंत असतानाही मतदार यादीत नावे नसणे, नावे डिलीट दाखवणे,बरेच मतदारांची नावे कामठी शहरातून कळमना च्या मतदान केंद्रावर ठेवले.बहुतेक मतदारांची नावे मतदार यादीतून वगळले होते या प्रकारच्या सर्व चुकांमुळे बहुतांश मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले तेव्हा या संवैधानिक अधिकारातील मतदानापासून वंचीत ठेवणाऱ्या या मतदान यंत्रणेवर कायदेशीर कार्यवाही होणे गरजेचे आहे.
कामठी विधानसभा मतदार संघातील छावणी परिषद अंतर्गत 5 मतदान केंद्र होते एकूण 5 मतदान केंद्रात एकूण 5607 मतदार होते त्यातील मतदान केंद्र क्र 50 येथील एकूण 1274 मतदारातून फक्त 224 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच गोदाम रहिवासी 50 च्या वर मतदारांना हयात असूनही मतदार यादीत नावे नसल्याच्या नावाखाली वंचीत राहावे लागले.