बस कंत्राटी कामगारांना पगार वाढ झालीच नाही आयुक्तांना निवेदन

– जर आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाही तर संप पुकारणार

नागपूर :- नागपूर मनपा आपली बस कंत्राटी कामगार संघाचे महासचिव कमलेश वानखेडे यांचे नेतृत्वात कामगारांच्या हक्कासाठी पगार वाढीसाठी गेल्या ३ वर्षापासून आयुक्तांसह व अधिकाऱ्यांसोबत विधान परिषदेचे आमदार प्रवीण दटके यांच्या नेतृत्वात देखील या मुद्द्यावरील अनेकदा चर्चा व बैठका झाल्या परंतु आज पर्यंत कर्मचाऱ्यांना ( चालक व वाहक ) यांना पगार वाढ अद्यापही झाली नाही. समस्या वाढतच आहे. वारंवार पत्रव्यवहार केले, बैठका घेतल्या तरी सुद्धा सकारात्मक समाधान किंवा उत्तर मिळाले नाही. मनपायुक्तांना भेटण्याची वेळ तसेच कित्येक दा बैठका झाल्या त्याचे अद्यापही उत्तर मिळाले नाही. याकरिता बस कंत्राटी कामगार आक्रमक होऊन संप पुकारण्याचा निर्णय घेतलेला आहे. जर आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सर्वच बस कंत्राटी कामगार संप करणार ! येणाऱ्या आठ दिवसात आमच्या मागण्या मंजूर झाल्या नाहीत तर संप पुकारण्यात येईल आणि यादरम्यान काही अतिप्रसंग घडले तर मनपा शासन जबाबादार राहतील. महासचिव कमलेश वानखेडे, कोषाध्यक्ष निलेश पवनीकर, उपाध्यक्ष सुमित चिमोटे, प्रवीण काटोले, आणि प्रवीण नरवने, हे अथक परिश्रम घेत असून प्रसिद्धीद्वारे महासचिव कमलेश वानखेडे यांनी सांगितले आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राहुल गांधींच्या आरक्षणविरोधी षडयंत्राचा बुरखा फाटला - ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी नोंदविला आरक्षण विरोधी भूमिकेचा निषेध

Wed Sep 11 , 2024
नागपूर :- संविधान हातात घेऊन ‘संविधान खतरे में हैं’ची बतावणी करीत दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांची दिशाभूल करून सत्ता काबिज करण्याचा प्रयत्न असो किंवा देशातील दलित आणि आदिवासींना कसा धोका आहे, हे संभ्रमित करून पटवून देणे असो, अशा अनेक कृती मागील अनेक महिन्यांत राहुल गांधींनी केल्या. मात्र ज्यांच्या रक्तातच दलित, आदिवासी आणि मागासवर्गीयांचा तिरस्कार आहे, त्यांचे सत्य जास्त काळ लपून राहू […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com