संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी
स्लग-मागिल अडीच वर्षांपासून ब्रेथ ऍनालायझर मशीन धूळखात
कामठी ता प्र 1 ऑगस्ट :- मद्यप्राशन करून वाहन चालविताना स्वतःबरोबर रस्त्यावरून चालणाऱ्या इतरांचेही जीव धोक्यात घालणाऱ्या तळीरामाना कोरोनाच्या नावाखाली मागील अडीच वर्षांपासून मोकाट रान मिळाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे मद्यपी वाहनचालकांची तपासणी करायची नाही त्यांना ब्रेथ एनालायझर लावायचा नाही असे आदेश शासनाने दिल्यामुळे मागील अडीच वर्षांपासून या तळीरामाना वाहतूक पोलिसांकडून ना दंड केला जात आहे ,ना कुठली कार्यवाही जात आहे तर पोलिसांकडे असलेले हे ब्रेथ ऍनालायझर मशिन मागील तीन वर्षांपासून धूळखात पडले आहेत, यातून तळीरामाना निर्माण झालेला वाहतूक पोलिसांचा अभयपणा मुळे तळीराम आपल्याच धुंदीत वावरत आहेत.दररोज तळीराम बिअर बार वा देशी दारू च्या दुकान मधून तसेच कुठल्यातरी ढाब्यावरून दारू पिऊन निघतात परंतु वाहतूक पोलिसांना या तळीरामावर कार्यवाहीच करता आली नाही.
मागील अडीच वर्षात कुणीच मद्यप्राशन करून वाहन चालविले नाही असे म्हटले तर त्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही मंग मद्यप्राशन करून वाहन चालविण्यात आले दररोज बिअर बार व दारू दुकानातुन मद्यपी मद्यप्राशन करून दिवसा व रात्री वाहतूक करतात मग पोलीस यावर कार्यवाही का करीत नाही असा प्रश्न सहजच पुढे येतो परंतु कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी मद्यपी वाहन चालकांवर कार्यवाही होत नाही ,कार्यवाही करण्यासाठी ब्रेथ एनालायझर चा वापर होत नाही याचे जणू एक आश्चर्य च आहे.तेव्हा कोरोनाचा संसर्ग हा आटोक्यात आला आहे तेव्हा पोलिसांनी या तळीरामावर ड्रक अँड ड्राइव्ह ची कार्यवाही सुरू करण्यात यावी अशी मागणी येथील जागरूक नागरिक करीत आहेत.