मालमत्ता व पाणी करात सुट मिळण्यास अवघे काही दिवस शिल्लक, ३१ डिसेंबरपर्यंत लाभ घेण्याचे मनपाचे आवाहन

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली सुरु असून कर भरणा करतांना नागरीकांना लाभ व्हावा या दृष्टीने ३१ डिसेंबरपर्यंत मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी मालमत्ता व पाणी करात ५% सुट देण्यात येणार आहे. परंतु सदर सुट ही औद्योगीक मालमत्तेस लागु राहणार नाही.

यापुर्वी सन २०२२-२३ मध्ये ज्या नागरीकांनी एकमुस्त चालु आर्थिक वर्षाचा मालमत्ता व इतर कराचा भरणा केला असल्यास अशा मालमत्ता धारकांनाही सुट देण्यात येईल, मात्र सदर सुटची रक्कम पुढील आर्थिक वर्ष सन २०२३-२४ मध्ये समायोजीत करण्यात येणार आहे.

शहरातील मालमत्ता धारकांनी थकीत कराचा भरणा करावा यासाठी महानगरपालिकेमार्फत सूट देण्यात असुन याअंतर्गत एकमुस्त भरणा केल्यास ०१/१२/२०२२ ते ३१/१२/२०२२ पर्यंत कराचा एकमुस्त भरणा केल्यास चालू आर्थिक वर्षासाठी ५ % सुट देण्यात येणार आहे.

एकुण मालमत्ता करत सदर सुट देण्यात येत असल्याने मालमत्ता कर त्वरित भरण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

कराचा भरणा झोन कार्यालये तसेच https://www.cmcchandrapur.com या वेबसाईटवर ऑनलाईन सुद्धा करता येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचे 75 टक्के मतदान शांततेत.

Mon Dec 19 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 19 :- काल 18 डिसेंबर ला सकाळी साडे सात ते सायंकाळी 5.30वाजेपर्यंत कामठी तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच सदस्यपदाच्या निवडणूक मतदानात एकूण 68 हजार 185 मतदारांपैकी 50 हजार 689 मतदारांनी स्वयंस्फूर्तीने मतदानाचा हक्क बजावला.यानुसार निवडणूक अधिकारी तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या नेतृत्वात झालेल्या 27 ग्रामपंचायत निवडणूक मतदानाची टक्केवारी ही 75.3टक्के झाली असून उद्या 20 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!