…तर ईडी विरोधात सर्वोच्च न्यायालयात जावू – हेमंत पाटील

राहुल,सोनिया गांधीविरोधात कारवाईची मागणी

मुंबई :-नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात कॉंग्रेस नेत्या सोनिया आणि राहुल गांधी यांची अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) यापूर्वी चौकशी केली आहे. या दोन्ही नेत्यांविरोधात ईडीकडे पुरावे असल्याची माहिती देखील मध्यंतरीच्या काळात समोर आली होती.पंरतु, असे असतानाही त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही.ही बाब एकंदरीतच ईडीच्या तपास प्रक्रियेवर संशयाची सुई निर्माण करणारी आहे.गांधी कुटुंबियांना आतापर्यंत अटक का करण्यात आली नाही ? यासंदर्भात ईडीने स्पष्टोक्ती द्यावी,अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शनिवारी दिली. ईडीने भ्रष्टाचार करणाऱ्या या नेत्यांना अटक केली नाही,तर त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जावू,असा इशारा देखील पाटील यांनी दिला.

महाराष्ट्रातील अनेक नेते भ्रष्टाचाराप्रकरणी ईडीच्या रडारवर आहेत. यातील दोन मंत्री गेल्या काही काळापासून तुरूंगात देखील आहेत.लाखांच्या गैरव्यवहार प्रकरणातही अनेकांना ईडीने अटक केली आहे.पंरतु, कोट्यवधींचा घोटाळा असून देखील गांधी कुटुंबियांना अटक करण्यात आली नाही. महाराष्ट्रात सत्तांतरापुर्वी वेगवेगळ्या पद्धतीने आमदारांना ईडीने वेठीस ठरले होते. आमदारांनी भाजप आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यानंतर त्यांची चौकशीची ससेमिरेतून सुटका होते. ईडीने असा दुजाभाव करू नये, असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

सोनिया गांधी यांच्या चौकशीपूर्वीच ईडीकडून भष्ट्राचारासंबंधी पुरावे गोळा केले होते. शेल कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात आलेले मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील महत्वाचे धागोदोरे ईडीच्या हाती लागले आहेत. डोटेक्स या शेल कंपनीने असोशिएट जर्नल्स लिमिटेडला टेकओवर करण्यासाठी यंग इंडियन ला निधी दिला होता. एजेएलच्या ९० कोटींच्या कर्जाचे सेटलमेंट स्वरूपात कॉंग्रेसला यंग इंडियन कडून ५० लाख मिळाले होते.यानंतर एजेएल चे १०० टक्के शेअर यंग इंडियन ला हंस्तातरीत करण्यात आले होते. सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षा असतान २०११ मध्ये यंग इंडियन ने एजेएल अधिग्रहण केले होते. यासंबंधी कॉंग्रेसने कशाप्रकारे ९० कोटी रुपये दिले, या व्यवहाराची चौकशी सोनिया यांच्याकडे करण्यात आले आहे.

सोनिया आणि राहुल गांधी यांनी २०१० मध्ये यंग इंडिया नावाने कंपनी सुरू करीत दोन हजार कोटींची संपत्ती हडप केल्याचा आरोप करण्यात येत आहेत. या आरोपांमध्ये तथ्य असल्याने ईडीने पुन्हा तपास चक्रे फिरवली आहेत. शेल कंपनीच्या माध्यमातून गैरव्यवहार झाल्याचे प्रबळ पुरावे असतांना देखील या प्रकरणात अटक का करण्यात आलेली नाही? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला.कॉंग्रेस नेत्यांना या प्रकरणात अटक करण्यात आली नाही, तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे पाटील म्हणाले.

 

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते सुब्रमण्यम स्वामी यांना हिंदुत्वाचे आधारस्तंभ पुरस्कार प्रदान 

Sun Dec 11 , 2022
मुंबई :-राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ विचारवंत व संसदपटू सुब्रमण्यम स्वामी यांना ‘हिंदुत्वाचे आधारस्तंभ’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सभागृह मुंबई येथे झालेल्या या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन हिंदू एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे येथे करण्यात आले होते. यावेळी संस्थेच्या संस्थापिका व पत्रकार डॉ वैदेही तमन तसेच संतसमुदाय उपस्थित होता. भारत पूर्वीपासून अध्यात्मिक देश आहे. आत्मप्राप्ती करणे हे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com