संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आनंद नगर,रामगढ येथील सुधाकर इलेक्ट्रिक दुकानाचे टिनाचे पत्रे तोडून दुकानात अवैधरीत्या प्रवेश करून दुकानातील 6 कोंबड्या,चार आरो मशीन,सेट टॉप बॉक्स असा एकूण 28 हजार 650 रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना सकाळी 6 वाजता निदर्शनास आली असून यासंदर्भात फिर्यादी महेश बावणे वय 29 वर्षे रा रामगढ ने स्थानिक पोलीस स्टेशन ला दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपी विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.