पाच महिन्यानंतर घरी परतणारा युवक बेपत्ता

संदीप कांबळे, विशेष लेख 

कामठी :- नागपूर शहर पोलीस आयुक्तालय परिमंडळ क्र 5 अंतर्गत येणाऱ्या कळमना पोलीस स्टेशन हद्दीतून मागील पाच महिन्यांतर केरलाहुन छत्तीसगढ कोरबा येथील स्वगृही जाण्याच्या बेतात असलेला 37 वर्षोय तरुण संशयास्पद स्थितीत बेपत्ता झाल्याची घटना 29 ऑक्टोबर ला मध्यरात्री दीड दरम्यान घडली असून बेपत्ता तरुणाचे नाव मुरली परमेश्वर नायर वय 37 वर्षे रा वॉर्ड नं 11 , शिव मंदिर जवळ कोरबा छत्तीसगढ असे आहे.तर या घटनेने बेपत्ता तरुणाच्या कुटुंबात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून ‘पप्पा परत केव्हा येणार?अशी आर्त हाक बेपत्ता तरुणाचे दोन मुलं आपल्या आई कडे करीत आहेत.

प्राप्त माहितीनुसार सदर बेपत्ता इसम मुरली नायर हा केरला येथील आयडियल क्रेन सर्वीस पाली चल रोड येथे क्रेन ऑपरेटर म्हणून मागील 20 वर्षांपासून कार्यरत असून वर्षातून तीन महिन्या नंतर सुट्टी काढून छत्तीसगढ येथील स्वगृही येऊन कुटुंबासह एक महिना वास्तव्य करून पूनश्च केरला येथे कामावर परत जात असे त्यानुसार 28 ऑक्टोबर ला तब्बल पाच महिन्यानंतर केरला हुन स्वगृही येत असल्याचे फोन वरून झालेल्या संभाषणातून घरात मोठ्या उत्साहाचे वातावरण होते तसेच त्यांच्या पाठीमागे असलेली पत्नी पिंकी, 8 वर्षीय मुलगी विशाल 10 वर्षोय खूप आनंदित होते.28 ऑक्टोबर ला सदर बेपत्ता तरुणाने पत्नी पिंकी शी मोबाईल वर संभाषण साधुन नागपूर रेल्वे स्टेशन वर थांबला असून यायला रेल्वे गाडी नसल्याने येण्यास उशीर होत आहे अशी बतावणी केली त्यानंतर काही वेळा नंतर फोन केल्यास मानसिक दृष्ट्या बीघडलेल्या स्थिती सदृश्य ची भाषा वापरल्याने पत्नीला ही आश्चर्य वाटत होते दरम्यान सदर बेपत्ता इसम हा रात्रीच्या वेळी लोकांचे दार ठोठावून माझे घर शोधुन द्या असे म्हणत लोकांना त्रास देत असल्याची माहिती राहुल झा नामक व्यक्तीने मोबाईल वर त्याच्या पत्नीला दिले असता त्याच्या पत्नीने तिच्या पतीची मानसिक स्थिती बरोबर नसल्याचे जाणवते तेव्हा त्यांना नजीकच्या पोलीस स्टेशन च्या ताब्यात द्या आम्ही त्यांना घ्यायला येतो असे सांगितले असता राहुल झा नामक व्यक्तीने सदर बेपत्ता इसमाला कळमना पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले तर घरमंडळी पोलीस स्टेशन ला पोहोचण्या आधीच पोलीस स्टेशन मधून निघून गेला होता मात्र त्याची बॅग कळमना पोलीस स्टेशन लाच होतो.यावेळी सदर बेपत्ता तरुणाची पत्नी पिंकी नायर ह्या आपल्या वडिलांशी 29 ऑक्टोबर ला कळमना पोलीस स्टेशन गाठले असता सदर इसमाची बॅग सुपूर्द करण्यात आली मात्र त्याचा मोबाईल ही स्वीच ऑफ असल्याने संपर्क होऊ शकला नाही तेव्हा यासंदर्भात पोलिसांनी गंभीरतेची भूमिका घेऊन शोधकामाला गती द्यावी अशी विनवणी पत्नी पिंकी नायर ने केली मात्र पोलिसांनी तिच्या विनंतीला फेटाळून लावून हाकलले अश्या परिस्थितीत पतीच्या शोधात सर्वत्र भटकंती करीत शोध घेतला मात्र कुठेही थांगपत्ता लागला नव्हता.तर सतत तीन दिवस आपल्या दोन लहान मुलांना घरी एकटे सोडून पतीच्या शोधात कोरबा हुन नागपूरला येऊन शोध करीत होते दरम्यान त्यांची भेट कामठी बस स्थानक चौकात पटेल न्यूज पेपर एजन्सी कार्यालयात एका समाजसेवकाशी झाले असता तिने आपली आपबीती सांगून मदतीची याचना केली यावर सदर समाजसेवकाने माणुसकीच्या नात्यातुन कळमना पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकूर यांच्याशी मोबाईल वर संपर्क साधुन सदर परिस्थितीशी अवगत केले असता त्यांनी त्वरित सदर घटने संदर्भात मिसिंगची तक्रार दाखल करून शोधकामाला गती दिली.तेव्हा सदर बेपत्ता इसमाचा शोध लावणे पोलिसांना एक आव्हान जरी असले तरी बेपत्ता मुरली नायर च्या प्रतीक्षेत घरमंडळी डोळे टक करून बसले आहेत.

– बेपत्ता मुरली नायर चे वय 37 वर्षे असून उंची 5 फूट पाच इंच, चेहरा गोल,रंग सावळा,बांधा सळपातळ,शर्ट पॅन्ट परिधान केलेले असलेल्या सदर वर्णनाचा इसम आढळल्यास कळमना पोलीस स्टेशन तसेच पिंकी नायर मो क्र 8349060514 या क्रमांकावर संपर्क साधून मदत करावी .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भगवान श्री अग्रसेन जन्मोत्सव-2023

Thu Oct 5 , 2023
– चार दिवसिय समारोह के सभी कार्यक्रम तय – जोर-शोर के साथ मनाई जायेंगी अग्रसेन जयंती नागपूर :- परम् वंदनीय अग्रकुल प्रवर्तक भगवान अग्रसेन जन्मोत्सव-2023 का आयोजन दिनांक 12 अक्टूबर से 15 अक्टूबर 2023 तक आयोजित किया गया है। भगवान अग्रसेन जन्मोत्सव-2023 के स्वागताध्यक्ष संदीप अग्रवाल के नेतृत्व में जन्मोत्सव समिति पूरे जोश से कार्य कर रही है। जन्मोत्सव की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com