युवकाला डोक्यावर मारून केले जख्मी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- दवाखान्यातुन दुचाकीने घरी परत जाताना कोळसा खदान नं.३ मडीबाबाच्या जवळ लोकांची गर्दी दिसल्याने अभिषेक सिंग यांने दुचाकी थांबवुन लोकाना काय झाल्याचे विचारले असता सुनिल प्रजापती व सुशिल प्रजापती यांनी दारू पिऊन येऊन शिविगाळ करून सुनिल प्रजापती यांने रॉड ने डोक्यावर मारून जख्मी करून शिविगाळ व जिवे मारण्याची धमकी देत पळुन गेल्याने कन्हान पोलीसानी फिर्यादीच्या तक्रारीने गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.

रविवार (दि.६) ऑगस्ट ला रात्री ९.३० वाजता दरम्यान जे.एन.हॉस्पिटल येथुन अभिषेक अजित सिंग वय २४ वर्ष रा. कोळसा खदान नं.६ ता. पारशिवनी जि. नागपुर हा कोळसा खदान नं.६ आपल्या घरी दुचाकीने जात होता. कोळसा खदान नं.३ मडीबाबाच्या जवळ सागर यादव याची गाड़ी उभी दिसुन तेथे लोक उभे होते. अ़भिषेक ने दुचाकी थांबवुन तेथे उभे असलेल्या लोकाना विचारले की काय झाले आहे. तेव्हा सुनिल प्रजापती व सुशिल प्रजापती दोन्ही रा. कांद्री-कन्हान हे दारू पिऊन जवळ येऊन शिविगाळ करू लागले आणि सुनिल प्रजापती याने त्यांचे जवळी ल रॉड ने डोक्यावर मारून शिविगाळ करित जिवे मारण्याची धमकी देऊन तेथुन पळुन गेले. अभिषेक ला डोक्यावर मार लागल्याने जख्मी अवस्थेत पोलीस स्टेशन कन्हान गाठुन सुनिल प्रजापती आणि सुशिल प्रजापती यांचे विरूध्द तक्रार दिल्याने पो स्टे कन्हान चे पोहवा नरेश श्रावणकर हयानी पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनात आरोपी १) सुनिल प्रजापती २) सुशिल प्रजापती दोन्ही रा. कांद्री-कन्हान ता. पारशिवनी जि नागपुर यांचे विरूध्द अप क्र. ५०६ /२०२३ कलम ३२४, ५०४, ६०६, भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास करित आरोपी चा शोध घेत आहे .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

चरैवेति फाउंडेशनद्वारा ‘फन विथ फिजिक्स’ चे आयोजन!

Tue Aug 8 , 2023
नागपूर :- चरैवेति फाउंडेशनद्वारा ‘फन विथ फिजिक्स’ या कार्यक्रमाचे नागपुरात आयोजन करण्यात आले. पहिला कार्यक्रम सोमलवार महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला प्रामुख्याने कृष्णेंदू चक्रवर्ती, फ्रीलान्स विषय शिक्षक, माजी एचओडी, भौतिकशास्त्र विभाग, स्ट्रेटफोर्ड ग्रामर स्कूल, मँचेस्टर, युनायटेड किंगडम यांच्या मार्फत भौतिकशास्त्रातील विविध प्रयोगाच्या माध्यामातुन अतिशय मजेशिररित्या विद्यार्थांना विज्ञानाचे प्रयोग दाखविले. सोमलवार शाळेतील कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सोमलवार अकॅडमीचे कोषाध्यक्ष रोहीत सोमलवार, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com