नागपूर :- नागपूर महानगरपालिका (एनएमसी),सोशिओ इकोनॉमिक डेवलपमेंट ट्रस्ट स्वप्नभूमी (SEDT) आणि HCL फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यंग कलाम विज्ञान महोत्सव २०२५ चे आज उद्घाटन आंचल गोयल, अतिरिक्त आयुक्त, नागपूर महानगरपालिका यांच्या हस्ते बॅरिस्टर शेषराव वानखेडे विदया निकेतन, रामदासपेठ येथे झाले. या महोत्सवाला शाळा, विद्यार्थी, आणि शिक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ४५ शाळांनी ६० पेक्षा अधिक विज्ञान प्रयोग सादर केले. मुख्य म्हणजे नागपूर महानगर पालिका शाळेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टाकाऊ वस्तू पासून विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग जसे की सोलर एनर्जी,टरबाईन एनर्जि, सेन्सर बेस स्ट्रीट electricity, सोलर सिस्टम सारखे आजून इतर प्रयोग खूप उत्साहाने आणि आत्मविश्वासाने मराठी, हिन्दी आणि इंग्रजी भाषेत आलेल्याvisitors च्या समोर सादर केले.
या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त, नी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच पुढे त्या म्हणाल्या की “व्यक्तीच्या दैनंदिन जीवनात प्रत्येक दिवशी विज्ञानाचा कळत-नकळत उपयोग होत असतो म्हणून विज्ञान विषयाला कठीण न करता सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवले पाहिजे . तसेच “विज्ञान आणि गणित हे विषय समजून आणि प्रॅक्टिकली करून शिकण्याचे विषय आहेत” असे ही त्या आपल्या संबोधनमध्ये म्हणाल्या. हे प्रयोग बनविण्यासाठी मनपा शाळेतील शिक्षकांनी कठीण परिश्रम घेतले ज्यासाठी सोशिओ इकोनॉमिक डेवलपमेंट ट्रस्ट स्वप्नभूमी (SEDT) आणि HCL फाऊंडेशन यांनी ते प्रयोग सादर करण्यासाठी मंच उपस्थित करून दिला.
या वर्षीच्या महोत्सवामध्ये १५० पेक्षा अधिक विद्यार्थी आणि ५० पेक्षा अधिक महापालिकेच्या शिक्षकांचा सहभाग होता, तसेच महानगरपालिकेच्या ६०० हून अधिक विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली. विद्यार्थ्यानी सादर उद्घाटन समारंभात मा. डॉ. अतुल वैद्य, उप-कुलगुरू , एलआयटी विद्यापीठ, नागपूर, आणि साधना सयाम, शिक्षणाधिकारी, महानगरपालिका नागपूर उपस्थित होते. एचसीएल फाऊंडेशन तर्फे
शशांक खरे आणि पियूष वानखेडे, तसेच HCL चे भारतातील इतर राज्यांतील सहकारी आवर्जून उपस्थित होते. तसेच नागपूर महानगरपालिका शिक्षण विभागातून सहा. शिक्षणाधिकारी , सर्व शाळा निरीक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन SEDT संस्थेचे संस्थापक सूर्यकांत कुलकर्णी आणि अजिंक्य कुलकर्णी यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. या ६० पेक्षा अधिक विज्ञान प्रयोगांची विभागणी छोटा गट आणि मोठा गट अशा दोन गटांमध्ये करण्यात आली होती. प्रत्येक गटातील विजेत्या ३ संघांना ट्रॉफी, प्रमाणपत्र, आणि रोख रकमेची बक्षिसे देण्यात आले. यामध्ये उच्च प्राथमिक गटामध्ये प्रथम पारितोषीक वाल्मिकी नगर हिन्दी माध्यमिक शाळा, द्वितीय पारितोषीक लाल बहादूर शास्त्री तृतीय पारितोषिक कुंदनलाल गुप्ता उ. प्रा. शाळा तर माध्यमिक गटात प्रथम पारितोषीक कपिल नगर हिन्दी माध्यमिक शाळा , द्वितीय पारितोषीक संजय नगर हिन्दी माध्यमिक शाळा तर तृतीय पारितोषीक जी. एम. बनातवाला या शाळेच्या विद्यार्थ्यानी पटकावले. या प्रसंगी विज्ञानचे प्रयोग परीक्षांकरिता डॉ. श्रुती पाटले, विभागप्रमुख, अप्लाइड फिजिक्स विभाग, प्रियदर्शनी जे. एल. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, नागपूर गणेश सी. वांडिले, सहायक प्राध्यापक, फिजिक्स विभाग, श्री मथुरादास मोहोता कॉलेज ऑफ सायन्स, नागपूर, डॉ. शीतल देशमुख, वनस्पतीशास्त्र विभाग, शिवाजी सायन्स कॉलेज, नागपूर, डॉ. शिल्पा पांडे, विभागप्रमुख, फिजिक्स, एलआयटी विद्यापीठ, नागपूर यांनी केले.
यंग कलाम विज्ञान महोत्सव – नागपूर २०२५ हा कार्यक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करून नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याचे उद्दिष्ट ठेवत नागपूरच्या शिक्षणक्षेत्रातील महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.