मराठी पत्रकारितेचे कार्य अतुल्य असून देशाचा गौरव वाढविणारे – महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी

अमरावती :- भाषिक पत्रकारितेने प्रादेशिक स्तरावर लोकशाहीला विशाल वटवृक्षामध्ये रूपांतरित करण्यासाठी नेहमीच योगदान दिले आहे. भारता सारख्या बहूसांस्कृतिक आणि बहूभाषिक देशात हे योगदान अधिक महत्वपूर्ण ठरते. त्यामुळे मराठी पत्रकारितेचे कार्य हे अतुल्य असून देशाचा गौरव वाढविणारे आहे असे मत भारतीय जनसंचार संस्थानचे महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी यांनी व्यक्त केले.

भारतीय जनसंचार संस्थानच्या अमरावती विद्यापीठ परिसरातील पश्चिम क्षेत्रीय केंद्राच्या वतीने मराठी पत्रकारिता दिनानिमित्य दिनांक ६ जानेवारी २०२३ रोजी भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहात ‘संपादक संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ‘मराठी पत्रकारितेचे बदलते स्वरूप’ या विषयावर मुख्य वक्ता म्हणून ते बोलत होते. यावेळी विचार मंचावर नागपूर येथील दैनिक लोकमतचे कार्यकारी संपादक श्रीमंत माने, दैनिक तरुण भारतचे मुख्य संपादक गजानन निमदेव, विद्यापीठाच्या मराठी व हिंदी भाषा विभागप्रमुख प्रा. डॉ. मोना चिमोटे, कार्यक्रमाचे अध्यक्ष भारतीय जनसंचार संस्थानचे पश्चिम क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती उपस्थिती होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. 

पुढे बोलताना प्रा. डॉ. संजय द्विवेदी म्हणाले , भारतीय भाषा या सामान्यांशी संवाद साधण्याच्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या भाषा आहेत. ही भूमिका लक्षात घेऊन वाटचाल केल्याने मराठीने जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविला आहे. या कार्यात मराठी पत्रकारितेचे योगदान हे मोलाचे आहे. मराठी पत्रकारितेने भाषेला समृद्ध करण्या सोबतच जनसामान्याला न्याय मिळवून देण्याचे कार्य केले आहे. मराठी पत्रकारितेच्या प्रेरणेतूनच हिंदी पत्रकारितेचा उदय देखील झाला असल्याचे प्रा. डॉ. द्विवेदी यांनी यावेळी सांगितले. येणाऱ्या काळात मीडिया क्षेत्रात रोजगाराच्या संधी अधिक वाढणार असून या क्षेत्रात करिअर करण्यासाठी स्वतः ला सक्षम करावे असा सल्ला देखील त्यांनी यावेळी विद्यार्थाना दिला.

दै. लोकमतचे श्रीमंत माने म्हणाले , विद्यार्थांनी ज्ञान वृद्धी साठी आपला जास्तीत जास्त वेळ वापरावा. भाषिक कौशल्य आत्मसात करावी. उत्तम, वाचन मुबलक शब्धसंग्रह, नव – नवीन शिकण्याची तयारी आणि रिस्क घेण्याची क्षमता तुम्हाला परिपूर्ण बनविते. हे युग प्रचंड स्पर्धेचे आहे. यात टिकण्यासाठी आपल्या आकलनाची गती वाढवावी लागेल. भाबळे आणि रोमँटिक राहून चालणार नाही. यश प्राप्तीसाठी प्रॅक्टिकली विचार करावा लागेल असा सल्ला देखील त्यांनी यावेळी विद्यार्थाना दिला

दै. तरुण भारतचे गजानन निमदेव म्हणाले , पत्रकारितेच्या क्षेत्रात भाषा व्याकरणाला अधिक महत्व आहे. परिणामकारक संवादासाठी भाषा महत्वाची असून विद्यार्थांनी यासाठी भरपूर तयारी करावी. सोबतच बोली भाषेचा दर्जा वाढविण्यासाठी देखील प्रयत्न करावे. पूर्वीच्या आणि आताच्या पत्रकारितेचे स्वरूप बदलले आहे याचा विचार करून विद्यार्थांनी त्या दिशेने सक्षम व्हावे. पेड न्युज आणि येलो पत्रकारिते पासून विद्यार्थांनी सावध राहावे. सामान्य माणसाच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि त्यांना न्याय मिळवून देणेसाठी पत्रकारितेचा क्षेत्रात यावे असा सल्ला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

अध्यक्षीय मनोगतात क्षेत्रीय संचालक प्रा. डॉ. वीरेंद्र कुमार भारती यांनी पाहुण्यांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. विनोद निताळे यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. मोना चिमोटे यांचे ही मनोगत झाले.

सुरुवातीला महासंचालक प्रा. डॉ. संजय द्विवेदी यांनी विद्यार्थ्यांनी काढलेल्या छायाचित्र प्रदर्शनीचे उदघाटन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांच्या मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील पाच प्रायोगिक वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनिल जाधव यांनी तर आभार डॉ. राजेश कुशवाहा यांनी मानले.

यावेळी मराठी, हिंदी आणि इंग्रजी पदव्यूत्तर पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसह शहरातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ आशिष दुबे, संजय पाखोडे, राजेश झोलेकर, कोमल इंगळे, नुरूझुमा शेख, भूषण मोहोकार, अनंत नांदुरकर, पंकज निखार आदीनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

To admit is to Accept

Sat Jan 7 , 2023
News today impact: As the saying goes, “honest to a Fault” Shahid Sharif immediately posted our news article link “RTE action committee, Is it a local Body”? on his whats app status. Wondering if it is an honest confession or lack of knowledge of English language https://newstoday24x7.com/rte-action-committee-is-it-a-local-body/ Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com