रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कार्य प्रगतीपथावर

नागपूर :- पावसाळयापूर्वी शहरातील खड्डे बुजविण्याकरीता मनपा हॉट मिक्स प्लॉन्ट विभागातर्फे झोननिहाय मोहिम राबविण्यात येत आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या निर्देशानुसार दहाही झोनस्तरावर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या हॉट मिक्स प्लॉन्ट विभागातर्फे सुरू करण्यात आलेल्या खड्डे बुजविण्याच्या मोहिमेमुळे सकारात्मक परिणाम दिसुन येत आहे. विभागातर्फे झोननिहाय खड्डयांची माहिती घेण्यात येऊन त्यानंतर २७ मे २०२४ पासून विविध झोन अंतर्गत प्राप्त यादीनुसार शहरातील १२ मीटर व त्यापेक्षा जास्त रुंदीच्या डांबरी रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात येत आहे. दैनंदिन वाहतुकीला कुठलाही अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता बाळगुन विभागातर्फे खड्डे बुजविण्याचे काम दोन चमुंद्वारे करण्यात येत आहे.

२७ मे ते १ जून २०२४ पर्यंत हॉट मिक्स विभागातर्फे १० पैकी ६ झोनमध्ये मनपा आयुक्तांच्या निर्देशानुसार मुख्य अभियंता राजीव गायकवाड यांच्या मार्गदर्शनात ३०४६.५१ चौरस मीटरचे खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले आहेत, अशी माहिती कार्यकारी अभियंता अजय डहाके यांनी दिली.

विभागाद्वारे २७ मे ते १ जून या कालावधीत धरमपेठ झोनमधील फ्रेन्ड्स कॉलनी ते निमपार्क, गंगानगर चौक ते निमपार्क, फायर इंजिनिअरींग कॉलेज ते काटोल नाका, व्हाईट बंगला रिंग रोड ते गणेशनगर वासनीक कॉलेज ते डीपीएस शाळा, नेहरूनगर झोनमधील रमना मारोती गेट ते प्रभू नगर, रमना मारोती रोड ते जे.पी.कॉन्व्हेंट, उमरेड रोड ते भगवती आयटीआय कॉलेज रोड ते रमना मारोती रोड, रमना मारोती रोड ते जे.पी.स्कूल, उमरेड रोड ते नवनाथ आयटीआय रोड, उमरेड रोड ते गॅस गोडाउन, चामट सभागृह ते खरबी चौक, खरबी चौक ते हसनबाग चौक, हसनबाग चौक ते श्री संतगोरा कुंभार चौक, हसनबाग ते श्रीकृष्ण नगर, हसनबाग पोलीस चौकी ते कॅनल रोड, हसनबाग चौक ते साकोरे चौक, हसनबाग पोलीस चौकी ते वृंदावन नगर ते केडीके कॉलेज रोड, शितला माता मंदिर ते हसनबाग चौक, नंदनवन सिमेंट रोड ते पांडव कॉलेज रोड, लकडगंज झोनमधील सर्जा बार ते बुलमोहर नगर, कामना नगर ते कळमना घाट, छापरू नगर ते वैष्णोदेवी चौक, आशीनगर झोनमधील कलाम चौक ते एनआयटी चौक, कामठी रोड ते पाडेवस्ती, एनआयटी चौक ते जैस्वाल सेलिब्रेशन, जैस्वाल सेलिब्रेशन ते आंबेडकर गार्डन, एनआयटी चौक समर्पन हॉस्पीटल, वैशाली नगर चौक ते आंबेडकर गार्डन, पॉवर ग्रीड चौक ते कबीर नगर चौक, आरमोर टॉवर ते समता नगर पुलापर्यंत सुगत नगर, विश्वदीप बुद्ध विहार ते इंडस्ट्रीअल एरिया, मंगळवारी झोनमधील गोंडवाना चौक, कडबी चौक ते अनैजा अपार्टमेंटजवळ क्लॉर्क टाउन, बेझनबाग ग्राउंड रोड, मंगळवारी फ्लाय ओवर रोड, मंगळवारी बाजार/ कॉम्प्लेक्स रोड, जरीपटका रोड इंदोरा रोड, कामठी रोड, किंग्जवे रोड डीआरएम ऑफीस, पाटणकर चौक ते तथागत चौक या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यात आलेले आहेत. मनपा हॉट मिक्स प्लाटच्या वतीने यापुर्वीच शहरातील विविध खराब व क्षतीग्रस्त 55 रस्त्यांचे डांबरीकरण करुन तयार केल्याने हे सर्व नमूद रस्ते नुकतेच खडे्मुक्त केले हे विशेष.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पो.स्टे. अरोली हद्दीमधील जुगार अड्डयावर धाड

Wed Jun 5 , 2024
  – नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई  अरोली :- पोस्टे अरोली येथील स्टाफ पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय सूत्रधाराकडून माहीती मिळाली की, पोस्टे अरोली हद्दीत कोदामेंढी सुर नदीच्या काठावर नर्सरीत झाडी झुडपीमध्ये काही लोक ५२ ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावुन हारजीतचा जुगार खेळत आहे. अशा खात्रीशीर माहिती वरून पोस्टे अरोली हद्दीत कोदामेंढी सुर नदीच्या काठावर नर्सरीत झाडी झुडपीमध्ये जुगार अड्डयावर रेड […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com