– १४ एकर शेतातले गहु पिक जळुन शेतक-यांचे ७ लाखाचे नुकसान.
कन्हान :- खोपडी येथील शेतकरी हयांनी सालवा गांगनेर शेतशिवारातील हॉय टेंशन टॉवर लाईन चा तार तुटुन गव्हाच्या उभ्या पिकात पडुन आग लागुन १२ एकर शेतातील गव्हाची राखरांगोळी होऊन शेक-यांचे ७ लाख रूपयाचे नुकसान होऊन चिंताग्रस्त झाल्याने माजी खासदार प्रकाश जाधव हयानी हॉय टेंशन टॉवर लाईन विभागाने त्वरित शेतक-यांना नुकसान भरपाई दयावी. अन्यथा तिव्र आंदोलनाचा ईशारा दिला आहे.
बुधवार (दि.२९) मार्च ला दुपारी साडे १२.३० वाजता सालवा गांगनेर शेतशिवारात कन्हान वरून आलेल्या सालवा येथील ठनपाल सदाशिव वंजारी यांच्या शेतातील हाई टेंशन विद्युत टावर मध्ये झालेल्या शाट सर्कीट मुळे टावरचे तार तुटुन शेतातील गहु पीका वर पडल्याने आग लागुन संपुर्ण गहु पीक जळाले. वाऱ्यामुळे आग पसरत इतर शेतात संपुर्ण गहु अस ल्यामुळे शीतल ठनपाल वंजारी व अमोल ठनपाल वंजारी असे १२ एकर शेतातील पीक जळाले. ही शेती बालाजी वेकंटनारायणा हयानी ठेक्यानी केली होती. तसेच मौजा गांगणेर चे मधुकर बापुराव दिवसे यांच्या २ एकर शेतातील संपुर्ण गहु पीक सुद्धा जळाले.
या आगीत सुदैवाने कुठलिही जीवहानी झाली नाही.अग्निशमन बंब येऊन आगीवर नियंत्रण मिळवे पर्यंत शेतक ऱ्यांच्या चौदा एकर शेतीतील उभे गव्हाचे पीक जळुन राखरांगोळी झाली. हाई टेंशन टॉवर लाईनचे अभियंता व कर्मचारी येऊन त्वरित तुटलेली तार त्वरित जोडुन विधृत प्रवाह सुरळीत केला. परंतु शेतक-यांच्या नुक सानी बाबत साधे आश्वासन सुध्दा दिले नाही. महसुल विभागाचे तलाठी, मंडळ अधिकारी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. या शेतक-यांच्या हाकेला धावुन माजी खासदार प्रकाश जाधव हयांनी घटनास्थळी पोहचुन संबधित अधिका-यांना फोन करून घटना स्थळी भेट देण्यास सांगितले. तेव्हा जिल्हा कृषी विभा गाचे कृषी अधिकारी पंकज लोखंडे, मौदा तालुका कृषी अधिकारी संदीप नाकाडे, कृषी सहायक कुकडे आदीने पंचनामा केला. या नुकसान ग्रस्त शेतक-यांना त्वरित नुकसान भरपाई मिळवुन देण्यात यावी.अन्यथा शासन व हॉय टेंशन टॉवर लाईन च्या अधिका-या विरूध्द उग्र आंदोलन करण्याचा ईशारा यावेळी देण्यात आला. याप्रसंगी ग्रामोन्नती प्रतिष्ठान केंद्रीय अध्यक्ष व शिवसेना माजी खासदार रामटेक प्रकाश जाधव, शेतकरी बालाजी वेकंटनारायणा मेका, दिलीप राईकवार, विलास लाडे, बलवंत खंगारे, अमोल सुटे, तुषार येलमुले सह शेतकरी उपस्थित होते.