संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 15 :- कामठी तालुक्यात मागील पाच दिवसापासून संततधार पाऊस सुरू आहे.तालुक्यातील नदी, नाल्या,ओढ्याना पूर आला असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.आज 15 जुलै रोजी सकाळी 6 वाजता कामठी तालुक्यातील केम गावातील गणेश बन्सीराम देऊळकर यांच्या घराची भिंत कोसळल्याने घराचे मोठे नुकसान झाले आहे.मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेत नुकसानग्रस्त गणेश देऊळकर यांनी शेजारी असलेल्या घरात कुटुंबासह आसरा घेतल्याने आज घराची भिंत कोसळल्याच्या घटनेत सुदैवाने जीवितहानी टळली.
महसूल प्रशासनाने मोक्का तपासणी करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा करीत तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त गणेश देऊळकर तसेच केम ग्रा प चे उपसरपंच अतुल बाळबुधे यांनी केले आहे.
मुसळधार पावसात घराची भिंत कोसळली
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com