संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– कामठी येथे चंद्रशेखर बावनकुळेंच्या प्रचारार्थ भव्य सभा
कामठी :- भाजपा सरकारने विविध कल्याणकारी योजनांद्वारे गरीब शेतकरी आणि महिलांच्या कल्याणासाठी महत्वाची पावले उचलली आहे. प्रत्येक नागरिकाला सक्षम बनवण्यासाठी भाजपा सरकार काम करीत आहे. भाजपाचे ध्येय केवळ आर्थिक विकास नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या जीवनमानात सुधारणा करणे आहे. निवडणुकीत भाजपा-महायुतीच्या विजयाने महाराष्ट्राने देशाला दिशा देणारे राज्य असल्याचा विश्वास ठाम होईल, असे प्रतिपादन मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी केले.
कामठी येथील जयस्तंभ चौकात कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. डॉ. मोहन यादव म्हणाले, भाजप सरकारने नेहमीच धर्म, सत्य, आणि न्यायाच्या मूलभूत मूल्यांवर आधारित कार्य केले आहे. भाजपा सरकारचे उद्दिष्ट प्रत्येक नागरिकाला न्याय आणि समता मिळवून देण्याचे आहे. हे सरकार केवळ विकासाच्या दिशेने काम करत नाही तर संस्कृती, परंपरा, आणि आध्यात्मिक मूल्यांचे संरक्षण करत लोकांना आपले वैभवशाली इतिहास आणि संस्कृतीची जाणीव करून देत आहे. पुढे ते म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारताचे घटनेचे शिल्पकार नव्हे, तर सामाजिक न्याय आणि समानतेचे एक महान पुरस्कर्ते होते. त्यांनी भारतीय समाजाला नवसंजीवनी दिली आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा दिली.
कामठीत दोन वर्षांत मेट्रो सेवा
यावेळी बावनकुळे यांनी महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाजपा-महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेच्या कल्याणासाठी काम करणार आहे. भाजपा सरकारच्या विकासात्मक धोरणामुळेच कामठी शहरात मेट्रो शहर होत आहे. येत्या दोन वर्षांत कामठी शहर मेट्रोने जोडले जाणार आहे. या भागाच्या विकासासाठी प्रयत्न निरंतर सुरू राहणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
भाजप दलित समाजाचे रक्षण करणारा पक्ष
माजी राज्यमंत्री सुलेखा कुंभारे म्हणाल्या की, आम्ही दलित समाजाचा भाजपाला नेहमी विरोध राहिला. मात्र, नंतर लक्षात आले की, भाजप हा जात, पात, धर्म, भेद न मानणारा पक्ष आहे आणि दलितांचे रक्षण करणारा एकमेव पक्ष आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे सर्व समाजासाठी आदर्शवत नेतृत्व आहे. त्यांनी कधीच जात, पात, धर्मभेद पाळला नाही. त्यामुळे सर्व जाती-धर्माचे लोक त्यांचा सन्मान करतात आणि त्यांचे नेतृत्वात काम करतात. कामठी विधान सभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी त्यांना विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे.
देवळी, साकोली, उमरेडमध्येही प्रचार सभांत हजेरी
बावनकुळे यांनी बुधवारी वर्धा जिल्ह्यातील आंजी येथे देवळी मतदारसंघातील भाजपा-महायुती उमेदवार राजेश बाकने, भंडारा जिल्ह्यातील लाखनी येथे साकोली मतदारसंघातील भाजपा-महायुती उमेदवार अविनाश ब्राह्मणकर, नागपूर जिल्ह्यातील कुही येथे उमरेड मतदारसंघाचे भाजपा-महायुती उमेदवार सुधीर पारवे यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्या. महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. कामठी-मौदा विधानसभा मतदारसंघात मौदा तालुक्यातील खात येथे सभा घेतली. यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर होते.
सर्व गावांत परमात्मा एक सेवक भवन
खात येथे सभेला संबोधित करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीचा निष्ठावंत कार्यकर्ता व या मतदारसंघातील जनतेचा प्रामाणिक सेवक म्हणून काम करण्याचा प्रयत्न केला आहे. परमात्मा एक सेवक आणि बाबा जुमदेवजी यांच्या अनुयायांचे पवित्र श्रद्धास्थान असलेल्या पावडदौना आश्रमाच्या विकासासाठी प्रयत्न केले. मौदा तालुक्यातील प्रत्येक गावात परमात्मा एक सेवक भवन बांधण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आ. टेकचंद सावरकर, अनिल निधान, अशोक हटवार, निशा सावरकर, सदानंद निमकर, चांगो तिजारे, नीलिमा घाटोळे, गज्जू यादव, मनीष वाजपेयी, उमेश रडके, पंकज साबळे, विवेक मंगतानी, लाला खंडेलवाल, अजय अग्रवाल, लालू यादव, अनंतलाल यादव, पंकज वर्मा, संध्या रायबोले, चंद्रशेखर तुप्पट, उज्वल रायबोले, लालसिंग यादव, विजय कोंडुलवार, कपिल गायधने, चन्द्रशेखर लांजेवार, रमेश वैद्य, गोपाल सीरिया, नरेश खोकरे, विजय कोंडूलवार, विनोद संगेवार, दिनेश शरण, अशफाक कुरेशी, श्रावण केझरकर, रेखा झंझाट, राज हाडोती, कुणाल सोलंकी, दीपक नेटी, देवेंद्र गवते, उन्मेष महल्ले, मंगला कारेमोरे, जया भस्मे, देवेंद्र गवते, मनीषा कारेमोरे, इश्वरचंड चौधरी, आशिष वंजारी, राजकिरण बर्वे, कुबेर महिल्ले, स्वप्नील शिवणकर, नरेश मोहाबे, मंगला करेमोर, जया भस्मे, मंदा महल्ले, राजश्री घिवले, शीतल चौधरी, रेणुका गुज्जेवर, सुनीता अगासे, राकेश खरोले, संदीप पोहेकर, राकेश काळे, मुकेश कानोजिय, रमन पाचे, राजेश पिपरेवर, सरिता भोयर, सुशांत काळे, राजेंद्र बैस, राकेश मेटकर, शुभम वाडी भस्मे, गजानन तिरपुडे, राकेश भस्मे, वंदना बावणे, सुमेध दुपरे, अमोल घडले, प्रवीण भोंगाडे, कविता रायबोले, मो. तारिक, राजा देशमुख, नरेश कलसे, शुभम गुजर, दिनेश स्वामी पिल्ले, चन्द्रशेखर तुप्पट, योगेश गायधने, संजय कनोजिया, नीतू दुबे, रोहित तरारे, प्रमेंद्र यादव, कुणाल सोलंकी, सुनील सिलाम, सुषमा सिलाम, कुंदा रोकड़े, रोशनी कानफाड़े, गायत्री यादव, दीपक नेटी, कुंदा रोकडे, गायत्री यादव, माजी नगरसेवक लालसिंग यादव, दिनेश शरण, पिक्कू यादव, आशू अवस्थी, अशफाक शेख, संदीप भनारे, दीपक नेटी, सोनू अमृतकर, अमित ठाकूर, सुमित शर्मा, धीरज सोळंकी, रोहित तरारे, राजा कुरील, अभिनव यादव उपस्थित होते.