संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– नीतिन ठाकरे चा बखारी ते मेंहदी रसत्यावरील पुलाजवळ गळा कापलेला मुतदेह आढळला.
कन्हान :- एंसबा ( नांदगाव) येथील मृतक नीतिन खुशालजी ठाकरे वय ३५ वर्ष हा पत्नी दीपाली नीतिन ठाकरे ही ९ महिन्याची गरोदरला नागपुर येथिल डागा रूग्णालयात प्रसुतीकरिता भर्ती करून सायंकाळी ४.३० वाजता सासुरवाडी जुनीकामठी ला जावुन परत सायंकाळी ७.३० वाजता नीतिन एंसबा घराकडे निघा ल्यावर कुणीतरी अज्ञात इसमांनी कुठल्यातरी कारणा वरून धारदार हत्याराने गळा कापुन जीवानिशी ठार करून बखारी ते मेंहदी रस्त्यावरील पुलाजवळ नेऊन टाकल्या असल्याची चर्चा असुन परिसरात खळबळ उडाली आहे. आज (दि.२६) जुन ला नीतिन ठाकरे ची पत्नी दीपाली हिची दुपारी ३ वाजता प्रसुती होऊन गोळस मुलीला जन्म दिल्याने जन्माला येण्यापुर्वीच मुलीच्या वडिलाची हत्या करून अज्ञात आरोपीने चिमुकल्या मुलीचे छत्र हिरावले.
मंगळवार (दि.२५) ला सायंकाळी एंसबा (नांद गाव) येथील युवक नीतिन खुशालजी ठाकरे वय ३५ वर्ष हा पत्नी दीपाली नीतिन ठाकरे ही ९ महिन्याची गरोदर असल्याने नागपुर येथिल डागा रूग्णालयात प्रसुती करिता भर्ती करून सायंकाळी ४.३० वाजता सासुरवाडी जुनी कामठी ला जावुन घरी परत जातो म्हणुन तेथुन निघाला. जुनीकामठी वरून सायंकाळी ७.३० वाजता एंसबा घराकडे निघाल्याचे वडिलानी त्याचा साळा दिपक इंगोले यास फोनकरून विचारले असता सांगितले. नीतिन कधीकधी दारू प्यायचा व घरी परत रात्री उशीरा यायचा म्हणुन वडिल खुशालजी नितीन रात्री घरी येऊन जाईल असे गृहीत धरून घरी झोपुन गेले. परंतु रात्रभर नीतिन घरी आला नाही.
बुधवार (दि.२६) जुन २०२४ ला सकाळी ८.३० वा.दरम्यान बखारी गावातील ओळखीचे माजी सरपंच नरेश ढोणे यांनी सांगितले कि,” तुमचा मुलगा नीतिन हा बखारी ते मेहंदी रोडवरील पुलावर पडलेला आहे. त्याचा गळा कापलेला दिसत असुन तो मरण पावलेला आहे व त्याचे जवळ पँशन दुचाकी क्र.एमएच ४९- ए- ७५७१ ही पडलेली आहे”, यावरून वडिल खुशालजी लगेच नातेवाईक संजय भोयर रा. खापरखेड़ा हे गावा त हजर असल्याने त्यांचे सोबत दुचाकीने बखारी ते मेहंदी रोडवरील पुलाजवळ गेले असता, तिथे पोलीस व ईतर लोक जमलेले दिसले. जवळ जावुन पाहिले तर तिथे पुलाजवळ मुलगा नीतिन ठाकरे याचा गळा कापलेला व मरण पावलेला स्थितीत दिसला. यावरून त्याना खात्री पटली कि, (दि.२५) चे सायंकाळचे ७.३० वा. ते आज बुधवार (दि.२६) चे सकाळी ८ वाजता दरम्यान त्यांचा मुलगा नीतिन ठाकरे यास कोणीतरी अज्ञात इसमांनी कोणत्यातरी अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने गळा कापुन त्यास जीवानिशी ठार केल्याची फिर्याद वडिल खुशाल नामदेवजी ठाकरे वय ६८ वर्ष रा. एंसबा (नांदगाव) हयानी पारशिवनी पोलीस स्टेशन ला दिल्याने पोलीसानी अप क्र २४१/ २०२४ कलम ३०२ भादंवि अन्वये अज्ञात आरोपी विरूध्द हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.
घटनास्थळी कन्हान पोलीस निरिक्षक उमेश पाटील व पाऱशिवनी पोलीस निरिक्षक राजेशकुमार थोरात पोउपनि मताने सह पोलीस स्टाप पोहचुन घटनास्थळावर पंचनामा करून मुतदेह शासकिय मेयो रूग्णालय नागपुर येथे शवविच्छेदना करिता पाठवुन पारशिवनी व कन्हान पोलीस अज्ञात आरोपीांचा शोध घेत आहे. रामटेक उपविभागीय पोलीस अधिकारी श्री रमेश बरकते हयानी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली.