पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न 

नागपूर :- दिनांक २३.०९.२०२४ रोजी ११:०० वा. पोलीस मुख्यालय, नागपुर शहर येथे डॉ. रविंद्रकुमार सिंगल पोलीस आयुक्त नागपुर शहर यांचे हस्ते वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी पोलीस आयुक्त यांनी संबोधीत करताना सांगीतले की, जलशक्ती मंत्रालय भारत सरकारच्या नॅशनल वॉटर मिशन अंतर्गत जलसंधारण व पर्यावणाचे रक्षणा करीता “एक पेड़ माँ के नाम” कार्यकमा अत्तर्गत सदर वृक्षा रोपण कार्यक्रम पार पाडले जात असून या कार्यक्रमाचा उद्देश वेग-वेगळे ठिकाणी वृक्षारोपण करून पर्यावरणाचा झालेली हानी, भरून काहणे तसेच जलसंधारण करून पाण्याचा योग्य वापर करणे हा आहे. फक्त वृक्षा रोपण करून चालणार नाही तर त्यांचे रक्षण करणेही आपली सर्वांची जबाबदारी आहे. असे सांगीतले.

‘वृक्ष आपणास निस्वार्थ ऑक्सीजनाचा आजीवन निरंतर पुरवठा करतात, तसेच पर्यावरणाचे संतुलन हे वृक्षांमुळे राखले जाते, जमीनीची ग्रुप होण्यापासून वृक्ष वाचवितात तसेच, वायु प्रदुषण प्रादुर्भाव कमी राखण्यास मदत करतात तसेच, निसर्गातील तापमानाचे संतुलन ही वृक्षांमुळे राखले जाते असे सांगुन, याकरीता “प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्याचे संवर्धन करावे” असा मोलाचा सल्ला दिला.

सदर वृक्षारोपण कार्यक्रम हा सरकारी टेल डॉट कॉम चे मुख्य कार्यकारी अधिकारी अमेया साठे यांचे सहकार्याने पार पाडला त्यानिमीत्याने पोलीस आयुक्त यांनी त्यांचे आभार व्यक्त केले. तसेच त्यांना पर्यावरणाच्या रक्षणाकरीता असेच कार्यक्रम त्यांनी भविष्यात ही करत राहावे अशा शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमास पोलीस मुख्यालयातील राखीव पोलीस निरीक्षक व त्यांचा स्टॉफ व नवप्रविष्ठ पोलीस अंमलदार तसेच इतर अधिकारी व अंमलदार बहुसंख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रेती चोरी करणाऱ्या आरोपींना अटक

Mon Sep 23 , 2024
कामठी :- पोलीस ठाणे नविन कामठी ह‌द्दीत, उमगांव जवळने कन्हान नदीचे पात्रालगत असलेल्या उमगांव-सोनेगांव रोडवर याठिकाणी दिनांक २१.०९.२०२४ चे २३.४५ वा. चे सुमारास, आरोपी १) गणेश ईश्वर शेंडे, वय २७ वर्षे, रा. उमगावं, कामठी २) लंकेश ज्ञानेश्वर शेंडे, वय ३१ वर्षे, रा. सोनेगाव राजा, कामठी, ३) आकाश भाऊराव कांबळे, वय ३१ वर्षे, रा. सोनेगाव राजा, कामठी हे त्यांचे १) ट्रक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com