नागपूर :- शहर पोलीस आयुक्तालयातील वाहतूक विभागातर्फे ‘ट्राफीक मिन्त्रा हा उपक्रम वाहतूक विभाग सुरू करीत आहे. यामध्ये व्हॉटस्अप नंबर 8976897698 यावर सर्वसामान्य नागरीकांसाठी शहरातील वाहतूक समस्या संबंधाने तक्रार नोंदविण्याची सुविधा असणार आहे. त्यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन, वाहतूक कोंडी, अपघात, पार्कंग ईत्यादींसारख्या समस्या नमुद व्हॉटस्अप नंबरवर पाठविल्यानंतर, त्यासंबंधीची माहिती पोलीस नियंत्रण कक्ष, नागपूर शहर येथे प्राप्त होवून सदरच्या तक्रारीचे तात्काळ वाहतूक विभागातर्फे निराकरण करण्यात येईल.
वाहतूकीच्या नियमांचे कोणी उल्लंघन करित असेल तर त्या संबंधीच्या तक्रारी आपण 8976897698 या व्हॉटस्अप नंबरवर पाठवू शकता. वाहतूक समस्या संबंधी व्हॉटस्अप नंबरवर तक्रार नोंद करतांना नमुद जागेचे फोटोसह, वेळ व ठिकाणे ही व्यवरथीत नमुद करावीत, जेणे करून, तक्रार प्राप्त होताच लगेच कार्यवाही करणे सोईचे होईल. ‘ट्राफीक मित्रा’ हे उपक्रम जनतेसाठी असुन, नागपूर शहरातील वाहतूक सुरळीत व नियंत्रित राहण्यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.
‘ट्राफीक मित्रा’ ही योजना वाहतूक समस्या संबंधाने तक्रार नोंदविण्याकरिता असुन, व्हॉटस्अप क्रमांक 8976897698 हा फक्त व्हॉटस्अप साठीच आहे.