संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- पाटील नगर कांद्री-कन्हान येथील बेबी सुखराम कोहळे या परिवारासह नागपुर गेल्या असता त्याच्या राहते घराचे लोंखडी गेट व व्दाराचे कुलुप तोडुन घरातील आलमरी मध्ये ठेवलेले नगदी बावन हजार रूपये चोरून नेल्याने कन्हान पोस्टे ला अज्ञात चोरा विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.
रविवार (दि.५) मे २०२४ ला सायंकाळी ५ वाज ता सौ. बेबी सुखरामजी कोहळे वय ५० वर्ष रा. वार्ड नं.६ पाटिल नगर कांद्री- कन्हान हया पती सुखराम व मुलगा विशाल सोबत नागपुर येथे त्यांच्या लहान बहिणीच्या पतीचा अपघात झाल्याने त्याना बघायला गेले व नागपुर ला त्यांचे घरी थांबले. सोमवार (दि.६) ला सायंकाळी ४.३० वाजता परिवारसह घरी परत आले, तेव्हा घराचे लोखंडी गेटचे कूलुप, मुख्य दरवाज्याचे कूलुप तुटुन खाली जमीनवर पडलेले होते. घराच्या आत प्रवेश केला असता बेडरूम मधिल आलमारी उघडी असुन त्यातील कपडे अस्त व्यस्त पडलेले होते. अलमारी पाहली असता आत ठेवलेले नगदी ५२००० रूपये दिसुन आले नाही. त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोराने चोरी केल्याने फिर्यादी बेबी सुखराम कोहळे हयानी कन्हान पोस्टे ला तक्रार दिल्याने स.फौ सुर्यभान जळते हयानी थानेदार उमेश पाटील यांचे मार्गदर्शनात अप क्र.३१०/ २०२४, कलम ४५४, ४५७, ३८० भादंंवि अन्वये अज्ञात चोरा विरुध्द गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आरोपीचा शोध घेत आहे.