शिक्षकाने दारुच्या नशेत घरीच गळफास घेत केली आत्महत्या

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत गणेश नगर येथिल रहिवासी शिक्षक मृतक विष्णु भरडे याने आपल्या राहत्या घरी दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने कन्हान पोलीसांनी बंडु भरडे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग चा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.

प्राप्त माहिती नुसार फिर्यादी बंडु केशव भरडे वय ४३ वर्ष आंबोली ता. चिमुर जि. चंद्रपुर हे तिघे भाऊ असुन एक बहिण आहे. १) बंडु भरडे २) राजु भरडे ३) विष्णु भरडे ४)  शारदा ननावरे असे असुन सर्व विवाहित असुन आप आपल्या परीवारा सह राहतात. बंडु भरडे यांचा ३ नंबर चा भाऊ विष्णु केशव भरडे वय ३५ वर्ष रा. गणेश नगर कन्हान हा मागिल ८ वर्षापासुन दखने हायस्कुल कन्हान येथे शिक्षक म्हणुन कार्यरत होता. गुरवार (दि.२७) जुलै सकाळी ७.३० वाजता दरम्यान कन्हान पोलिसांनी बंडु भरडे यांचा भाऊ राजु भरडे मो. ९२०९३३२५५४ या क्रमांका वर फोन केला आणि सांगितले की विष्णु भरडे यानी गळफास लावलेली डेडबॉडी त्याचे राहते घरी गणेश नगर कन्हान येथे मिळाली आहे. या वरून राजु भरडे यांनी बंडु भरडे ला जाऊन सांगितले तेव्हा बंडु भरडे हे आंबोली वरून आपल्या चुलत भाऊ नामे पुरूषोत्तम भरडे यांचा सोबत ग्रामिण उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे जाऊन पाहिले असता विष्णु याने त्याचे राहते घरी गळफास लावल्याने हा मृत अवस्थेत दिसला बंडु भरडे यांनी त्यास ओळखले. मृतक विष्णु हा दारू पिण्याच्या सवयिचा असुन त्याची पत्नी माधुरी विष्णु भरडे वय ३० वर्ष ही त्याचे राहते घरून मुलगी कु. हिरा वय ४ वर्ष हिला घेऊन मागिल चार पांच दिवसा पुर्वी तिचे माहेरी बेलगाव ता. भद्रावती. जि.चंद्रपुर येथे निघुन गेली. विष्णु हा दारू पिण्याच्या सवयिचा असुन त्याने दारूच्या नशेत गळ फास लावला असावा त्याचे मरणाबाबत बंडु भरडे यांना कोणावरही शंका संशय नसल्याने कन्हान पोली सांनी फिर्यादी बंडु भरडे यांचा तक्रारी वरून पोस्टे ला मर्ग क्रमांक ३१/२३ कलम १७४ जा. फौ गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रमोद मकेश्वर यांचा मार्गदर्शनात पोलीस हवालदार खुशाल रामटेके हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भूमिपूजन सोहळा संपन्न...

Thu Jul 27 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी – आज दिनांक २७/०७/२०२३ रोजी जिल्हा वार्षिक योजना जनसुविधा अंतर्गत मौजा नान्हा (मांगली) येथे १० लक्ष रुपयांचे व अनुसुचित जाती व नवबौध्द घटकाचा विकास करणे अंतर्गत मौजा रानमांगली येथे ६ लक्ष एकूण १६ लक्ष रुपयाच्या विकास कामांचे भूमिपूजन प्रा. अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे सभापती महिला व बालकल्याण समिती जि.प. नागपूर यांच्या व मान्यवरांच्या हस्ते पार पडले. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com