नागपूर :- स्वाईन फ्ल्यू मृत्यू विश्लेषण समितीद्वारा (Death Audit Committee) बुधवार (ता.04) नागपूर शहरातील स्वाईन फ्ल्यू मुळे झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यात आला.
मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात पार पडलेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सचिव वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे सुक्ष्मजिव शास्त्रचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रविंद्र खडसे, वरिष्ठ रहिवासी डॉ. अभिनव वानखेडे, जिल्हा परिषद नागपूरचे जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. विनोद बीटपल्लीवार यांच्यासह खाजगी रुग्णालयाचे प्रतिनिधी प्रमुख्याने उपस्थित होते.
या बैठकीमध्ये समितीपुढे इन्फल्युएंझां ए मुळे मृत पावलेल्या एकूण 2 रुग्णांची माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता एक रुग्ण मध्ये प्रदेश व दुसरा रुग्ण नागपूर शहरातील असल्याचे निष्पन्न झाले. यापैकी मध्ये प्रदेश येथील रुग्णाचा मृत्यू इन्फल्युएंझां ए एच 1एन 1 ने झाल्याचे प्रमाणित करण्यात आले. तर एच 3 एन 2 असलेल्या रुग्णाचा मृत्यु हृदय रोग संधीवात व थॅलेसेमीया या सहव्याधी मुळे झाल्याचे निष्पन्न झाले.
यावर्षी 1 जानेवारी 2023 पासुन 8 स्वाईन फ्ल्यू मृत्यु विश्लेषण बैठकी झाल्या असून, यामध्ये एकूण 10 इन्फल्युएंझां ए एच 1एन 1 व एच 3 एन 2 मुळे मृत्यु झालेल्या संशयीत रुग्णांच्या मृत्युचे विश्लेषण करण्यात आले. त्यापैकी 6 मृत्यु इन्फल्युएंझां ए एच 1एन 1 मुळे झल्याचे घोषित करण्यात आले आहेत. व यामध्ये 50 वर्षावरील रुग्णांची संख्या 6 इतकी होती. या पैकी 3 महिला व 3 पुरुष होते व या सर्वाचे वय 50 वर्षा वरील होते.
मृत्यू विश्लेषण समितीद्वारे इन्फल्युएंझां ए एच 1एन 1 व एच 3 एन 2 मुळे विश्लेषणा वरुन काही शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. सर्व आरोग्य संस्था यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहव्याधी असणारे व्यक्ती व ज्येष्ठ नागरिक यांची फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळताच योग्य ते उपचार सुरु करावे व आरोग्य स्थितीवर लक्ष देऊन आवश्यकतेनुसार रुग्णालयात संदर्भीत करावे. ILR व सारी रुग्णाबाबत क्षेत्रीय सर्वेक्षण सक्षम करावे. ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असलेल्या रुग्णंनी इन्फल्युएंझां ए लसीकरणाच्या डोस घ्यावा. वैयक्तिक स्वस्छता जसे, वांरवार हात धुणे, सॅनीटायझरने हाथ निर्जतुंक करणे, खोकलताना, शिंकताना तोडावर रुमाल धरावा. वारंवार स्पर्श होणा-या वस्तु, जागा निंर्जतूक करा. आपणास फ्ल्यू सदृष्य लक्षणे असल्यास घरीच थांबा गर्दित जाऊ नका, भरपुर विंश्राती व पाणी घ्या. ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी असण्या-या व्यक्ती, गर्भवती स्त्रिया, लहान मुले यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. सर्व खाजगी रुग्णालयांनी त्याच्या आरोग्य संस्थेत उपचाराखाली असलेल्या इन्फल्युएंझां ए एच 1एन 1 रुग्णाची माहिती म.न.पा साथरोग विभागाला देण्यात यावी. विभागाद्वारा रुगणाच्या निवासी क्षेत्रात सर्वेक्षण करुन फ्ल्यू सदृष्य रुग्णांचा शोध व उपचार करण्यात येईल त्यामुळे रुग्णाचा प्रसार होणार नाही.
हे करा :-
• वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुवा.
• पौष्टिक आहार घ्या.
• लिंबु, आवळा, मोसंबी, संत्री, हिरव्या पालेभाज्या या सारख्या आरोग्यदायी पदार्थांचा आहारात वापर करा
• धूम्रपान टाळा
• पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या
• भरपूर पाणी प्या
* हे करु नका:-
• हस्तांदोलन
• सार्वजनिक ठिकाणी थुंकू नका
• डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नका
• आपल्याला फ्ल्यू सदृश्य लक्षणे असतील तर गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका