संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- पूर्वी स्वस्त धान्य दुकानातून गहू, तांदूळ, साखर, तेल असे लाभार्थ्याना मिळायचे मात्र काही दिवसांनी तेल बंद झाले आता गेल्या सहा महिन्यांपासून साखर बंद आहे.होळीचा सण असूनही लाभार्थ्यांना साखर न मिळाल्याने लाभार्थ्यांची गोड साखर झाली कडू अशी स्थिती निर्माण झाली आहे.
आर्थिकदृष्ट्या कमजोर लोक कबाड कष्ट करून उन्हा तान्हातून आल्यावर चहा पिऊन आपली भूक मिटवणारा व आपला थकवा दूर करणारा साखर गेल्या सहा महिन्यांपासून बंद झाल्याने 20 रुपये कीलोची मिळणारी साखर 40 ते 42 रुपये किलो प्रमाणे साखर किराणा दुकानातून जास्त दराने आर्थिक भुर्दंड लावून विकत घ्यावे लागत आहे.आधीच जिवणावश्यक वस्तूच्या महागाईने कंबर मोडली आहे ज्यामुळे जीवन जगणे कंठीण झाले आहे.त्यातच स्वस्त धान्य दुकानातून साखर गायब झाल्याने गरीब नागरिकांना किराणा दुकानातुन जास्त दराने साखर घ्यावे लागत आहे त्यामुळे नागरिक चहातुन मुक्त होण्याच्या मार्गावर आहे.हातावर आणून पानावर खाणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने त्यांना स्वस्त धान्य दुकानातून गेल्या सहा महिन्यापासून साखर मिळत नसल्याने शासनावर रोष व्यक्त केल्या जात आहे.
अंत्योदय धारकांना सुद्धा साखर तसेच 35 किलो धान्य बरोबर मिळत नसल्याची ओरड सुरू आहे.